डॉक्टर व्हायचयं, आधी बीएससीला प्रवेश घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:33 AM2019-06-28T00:33:32+5:302019-06-28T00:38:24+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी बारावीनंतर विद्यार्थ्यांना ‘नीट’ उत्तीर्ण करून थेट प्रवेश घेता येतो. मात्र भविष्यात डॉक्टर होण्यासाठी चक्क अगोदर बीएससीला प्रवेश घ्यावा लागण्याची शक्यता आहे. वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात अशा आशयाचा प्रस्तावच मांडण्यात आला आहे. नागपुरात विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे या धोरणावर मंथन आयोजित करण्यात आले असताना ही माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.

For Become Doctor, first take admission to BSc | डॉक्टर व्हायचयं, आधी बीएससीला प्रवेश घ्या

डॉक्टर व्हायचयं, आधी बीएससीला प्रवेश घ्या

Next
ठळक मुद्देनवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात प्रस्ताव : ‘बीडीएस’ झाल्यावरदेखील करता येणार ‘एमबीबीएस’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी बारावीनंतर विद्यार्थ्यांना ‘नीट’ उत्तीर्ण करून थेट प्रवेश घेता येतो. मात्र भविष्यात डॉक्टर होण्यासाठी चक्क अगोदर बीएससीला प्रवेश घ्यावा लागण्याची शक्यता आहे. वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात अशा आशयाचा प्रस्तावच मांडण्यात आला आहे. नागपुरात विद्यापीठशिक्षण मंचातर्फे या धोरणावर मंथन आयोजित करण्यात आले असताना ही माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.
नवीन धोरणाच्या मसुद्यात वैद्यकीय प्रवेशासंदर्भातील प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. कुशल वैद्यकीय तज्ज्ञ, नर्सेस वैद्यकीय शिक्षणातून बाहेर पडले पाहिजेत, असे उद्दिष्ट असले पाहिजे. वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अगोदर विज्ञान अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. या अभ्यासक्रमांमध्ये एक किंवा दोन वर्ष काढल्यानंतर मग वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया उत्तीर्ण करून पुढील प्रवेश घेता येईल. याशिवाय नर्सिंग, डेंटल इत्यादी वैद्यकीय शाखांमधील पदवीधरदेखील ‘एमबीबीएस’ला विविध माध्यमांतून प्रवेश घेण्यास पात्र राहतील, असे मसुद्यामध्ये नमूद आहे.
पदवी, पदव्युत्तरसाठी ‘कॉमन’ प्रवेश परीक्षा
‘नीट’च्या धर्तीवरच ‘एमबीबीएस’ तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी ‘कॉमन’ प्रवेश परीक्षा लागू करण्याचे मसुद्यात प्रस्तावित आहे. पदव्युत्तरसाठी ही परीक्षा ‘एमबीबीएस’च्या चौथ्या वर्षाच्या अखेरीस घेण्यात येईल. त्यामुळे निवासी डॉक्टर म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येणार नाही.

Web Title: For Become Doctor, first take admission to BSc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.