रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा  : शैलेश बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 08:24 PM2018-04-23T20:24:36+5:302018-04-23T20:24:54+5:30

अपघात कमी करायचे असेल, रस्त्यावरून रहदारी करताना स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा, असे आवाहन नागपूर ग्रामीणे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व ग्रामीणच्यावतीने सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याला सुरुवात झाली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Become road safety Ambassador: Shailesh Balkawade | रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा  : शैलेश बलकवडे

रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा  : शैलेश बलकवडे

Next
ठळक मुद्देरस्ता सुरक्षा पंधरवड्याला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : अपघात कमी करायचे असेल, रस्त्यावरून रहदारी करताना स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा, असे आवाहन नागपूर ग्रामीणे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व ग्रामीणच्यावतीने सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याला सुरुवात झाली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अभियानाचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहरचे शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीणचे श्रीपाद वाडेकर आदी उपस्थित होते.
शैलेश बलकवडे म्हणाले, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्यामुळेच अपघात वाढले आहेत. यामुळे वाहतूक सुरक्षेला घेऊन प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग महत्त्वाचा आहे, तरच अपघात कमी होतील. शिवाजी बोडखे यांनी यावेळी प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीचे नियम पाळणे का आवश्यक आहे याची मीमांसा करून वाहनधारकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली तर वाहतूक पोलिसांची गरज भासणार नाही, अपघाताला आळा बसेल, असेही ते म्हणाले. सुधाकर तेलंग यांनी अपघातांच्या कारणांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.
प्रास्ताविक शरद जिचकार यांनी केले. त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्यानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम, उपक्रम, आरोग्य शिबिर व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची माहिती दिली. संचालन मार्तंड नेवासकर यांनी केले तर आभार पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी मानले. कार्यक्रमात रस्ता सुरक्षा सामाजिक कार्यकर्ता व स्वातंत्र्य संग्राम सेनानी शंकरराव लांजेवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जीवन सुरक्षाचे राजीव वाघ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध देशपांडे, राजवर्धन करपे, अनंत भोसले, मोटार वाहन निरीक्षक आनंद मोहड आदी उपस्थित होते.
चित्र प्रदर्शनाचे कौतुक
रस्ता सुरक्षा या विषयाला घेऊन शहर आरटीओ कार्यालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात ८० चित्रांचा समावेश असून हेल्मेटपासून ते सीटबेल्ट, हेडफोन, अमली पदार्थांचे व्यसन व वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर प्रकाश टाकला. सर्वच चित्रे सुंदर रेखाटली असून प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रदर्शनाचे आयोजन करण्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे व विनोद जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Web Title: Become road safety Ambassador: Shailesh Balkawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.