भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:04 AM2019-07-27T00:04:37+5:302019-07-27T00:05:45+5:30

भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. भाजपचे सदस्य होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देश मजबूत करण्याच्या कार्याला समर्थन देणे होय. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासह सीमेपलिकडेही देशाचे वर्चस्व कायम करण्याला समर्थन देणे होय. भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले.

Becoming a member of BJP means patriotism: Ashish Shelar | भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन : आशिष शेलार

भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन : आशिष शेलार

Next
ठळक मुद्देभाजपा प्रभाग ३२ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. भाजपचे सदस्य होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देश मजबूत करण्याच्या कार्याला समर्थन देणे होय. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासह सीमेपलिकडेही देशाचे वर्चस्व कायम करण्याला समर्थन देणे होय. भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले.
भाजपच्या प्रभाग ३२ तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी स्मृती भवन, शारदा चौक येथे करण्यात आला. यावेळी शेलार बोलत होते. याप्रसंगी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार मोहन मते, नगरसेविका रूपाली ठाकूर, पुष्पा राऊत, दीपक चौधरी, अभय गोटेकर, संजू ठाकूर, परशु ठाकूर, बबनराव भुयारकर आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा केली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाची गती हजार पटीने वाढविली आहे. त्यांनी आता जलसिंचनाच्या कामातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा पण घेतला असून ते यात निश्चित यशस्वी होतील, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सत्कार हा आईवडिलांनी घेतलेल्या परिश्रमाचे ऋण व्यक्त करणारा असतो. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबत संस्कृतीचे व संस्काराचे जतन केल्यास जगाच्या स्पर्धेत आपला देश पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपच्या सदस्यता नोंदणीचा क्रमांक जाहीर करीत सदस्यता घेणाऱ्या दोन सदस्यांचा सत्कार केला. कार्यकर्त्यांनी वस्त्या, गल्ली व चाळीत जाऊन अधिकाधिक सदस्य बनवावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात दहावी, बारावीच्या २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Becoming a member of BJP means patriotism: Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.