नागपूर महामॅरेथॉनचा बिब कलेक्शन एक्सपो आज, उद्या महामॅरेथॉनचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 03:05 PM2023-02-04T15:05:04+5:302023-02-04T15:06:49+5:30

तज्ज्ञांचे मार्गदर्शन: धावपटूंना मिळणार टीप्स, विविध कार्यक्रम

Beeb Collection Expo of Nagpur Mahamarathon today, thrill of Mahamarathon tomorrow | नागपूर महामॅरेथॉनचा बिब कलेक्शन एक्सपो आज, उद्या महामॅरेथॉनचा थरार

नागपूर महामॅरेथॉनचा बिब कलेक्शन एक्सपो आज, उद्या महामॅरेथॉनचा थरार

Next

नागपूर : पहिल्या पाच पर्वांना लाभलेल्या धडाकेबाज प्रतिसादानंतर आता रविवारी (दि. ५ फेब्रुवारी) कस्तुरचंद पार्कवर पहाटेपासून आरसी प्लास्टो टॅंक्स ॲन्ड पाइप्स प्रा. लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय गॅस ॲथॉरिटी इंडिया लिमिटेड तसेच नीर्मय इन्फ्राटेक, लोकमत नागपूर महामॅरेथाॅनच्या सहाव्या पर्वाचा थरार रंगणार आहे.

नोंदणीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे नोंदणी हाऊसफुल्ल झाली आहे. तत्पूर्वी आज शनिवारी (दि. ४ फेब्रुवारी) हाॅटेल सेंटर पॉइंट रामदास पेठ येथे होणाऱ्या बिब एक्स्पो प्रदर्शनाची आस धावपटूंना लागली आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत टी-शर्ट, बिब (चेस्ट नंबर), गुडी बॅग वाटप केली जाणार आहे. याशिवाय तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक टीप्स दिल्या जाणार आहेत.

धन्यवाद नागपूर ! नावनोंदणीला हाऊसफुल्ल प्रतिसाद

महामॅरेथाॅनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ऑनलाइन, डिजिटली संपर्क साधून आपली नोंदणी वेळ संपण्याआधीच केली. त्यामुळे नोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि नोंदणी अल्पावधीतच हाऊसफुल्ल झाली. ज्यांना प्रत्यक्षात सहभागी होता आले नाही, त्यांनी या स्पर्धकांना चिअर अप करण्यासाठी आणि स्पर्धेचा फिल अनुभवण्यासाठी रविवारी पहाटे पाच वाजता कस्तुरचंद पार्कवर जरूर यावे. नागपूर ही क्रीडाप्रेमींची नगरी आहे. मग तो खेळ कोणताही असू दे, त्याला पाठिंबाही भरभरून देतात.

उद्या धावणार नागपूर

उद्या, रविवारी पहाटे साडेपाच वाजता कस्तुरचंद पार्कवर स्पर्धकांना धावण्याची उत्सुकता लागली आहे. २१ किमी, दहा किमी, पाच किमी आणि तीन किमी या चार शर्यतींंना ठरावीक अंतराने प्रारंभ करण्यात येणार आहे. त्याआधी वॉर्मअप म्हणून सर्वांचे आकर्षण असलेला झुंबा सुरू होईल. तेव्हा तणाव आणि मन मोकळे होण्यासाठी धावण्याचा मनमुराद आनंद घ्या. स्वत:शीच स्पर्धा करीत राहा. नागपूरकर... भागो बिनधास्त!!

नागपूरकरांना आवाहन

ज्यांना महामॅरेथॉनमध्ये प्रत्यक्षात सहभागी होता आले नाही अशा नागपूरकर उत्साही चाहत्यांनी धावपटूंचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्या वाजवाव्यात. त्याचवेळी धावण्याच्या मार्गात अडथळा येणार नाही याची खबरदारी म्हणून आपली वाहने सकाळी ६ ते ९ या वेळेत रस्त्यावर आणू नयेत, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

मॅरेथॉन शर्यतींचा मार्ग असा

२१ किमी : कस्तुरचंद पार्क येथून प्रारंभ, आकाशवाणी चौक ते उजवीकडे सेंट उर्सुला मैदान, व्हीसीए, डावीकडे सदर पोलिस स्टेशन, सेमिनरी हिल्स, उजवीकडे सेंटर पॉइंट स्कूलमार्गे बालोद्यान, टीव्ही टॉवर, सीपीडब्ल्यूडी क्वार्टर, व्हेटर्नरी कॉलेज, वायुसेनानगर, बॉटनिकल गार्डन, फुटाळा तलाव, फुटाळा तलाव फौंटेन रोड ते अमरावती रोड टी पॉइंटपासून यू टर्न त्याच मार्गाने तेलंग खेडी हनुमान मंदिर, वेकोली, एनसीसी हेड क्वार्टर ते जपानी गार्डनपासून यू टर्न एनसीसी हेडक्वार्टर, तेलंगखेडी हनुमान मंदिर, फुटाळा तलाव, बॉटनिकल गार्डन, वायुसेनानगर, व्हेटर्नरी कॉलेज, सीपीडब्ल्यूडी क्वार्टर, टीव्ही टॉवर, बालोद्यान, सेंटर पॉइंट स्कूलमार्गे सेमिनरी हिल्स ते नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट, व्हीसीए स्टेडियम, सेंट उर्सुला मैदान ते आकाशवाणी चौक ते डावीकडे कस्तुरचंद पार्क येथे समाप्त.

१० कि.मी. : कस्तुरचंद पार्क येथून प्रारंभ, आकाशवाणी चौक ते उजवीकडे सेंट उर्सुला मैदान, व्हीसीए, डावीकडे सदर पोलिस स्टेशन, सेमिनरी हिल्स, उजवीकडे सेंटर पॉइंट स्कूलमार्गे बालोद्यान, टीव्ही टॉवर यू टर्न एसएफएस कॉलेज, सेमिनरी हिल्स, नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट, व्हीसीए मैदान, सेंट उर्सुला मैदान, आकाशवाणी चौक ते डावीकडे कस्तुरचंद पार्क येथे समाप्त.

५ कि.मी. : कस्तुरचंद पार्क येथून प्रारंभ, आकाशवाणी चौक ते उजवीकडे सेंट उर्सुला मैदान, व्हीसीए, डावीकडे सदर पोलिस स्टेशन ते जपानी गार्डनपासून यू टर्न घेत नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट, व्हीसीए ग्राउंड, सेंट उर्सुला मैदान ते आकाशवाणी चौक ते डावीकडे कस्तुरचंद पार्क येथे समाप्त.

३ किमी : कस्तुरचंद पार्क येथून प्रारंभ, आकाशवाणी चौक ते उजवीकडे सेंट उर्सुला मैदान, व्हीसीए डावीकडे एसबीआय बँक सदरपासून यू टर्न ते सेंट उर्सूला हायस्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक, डावीकडे विधान भवन चौक ते कस्तुरचंद पार्क येथे समाप्त.

Web Title: Beeb Collection Expo of Nagpur Mahamarathon today, thrill of Mahamarathon tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.