नागपुरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:15 PM2020-05-26T22:15:28+5:302020-05-26T22:16:42+5:30
कोविड-१९ चा बाधित रुग्ण आढळून येताच महापालिका प्रशासनातर्फे संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील केला जातो. नागपूर शहरात २५हून अधिक परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मंगळवारी प्रथमच सहा परिसरातील निर्बंध हटविण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोविड-१९ चा बाधित रुग्ण आढळून येताच महापालिका प्रशासनातर्फे संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील केला जातो. नागपूर शहरात २५हून अधिक परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मंगळवारी प्रथमच सहा परिसरातील निर्बंध हटविण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
याद सतरंजीपुरा धून क्षेत्रातील तीन मंगळवारी झोनमधील एक,अशीनगर व गांधीबाग झोन मधील प्रत्येकी एका परिसराचा समावेश आहे. नियमानुसार २८ दिवसापर्यंत नवीन संक्रमित रुग्ण आढळून न आल्यास परिसरातील निर्बंध हटविले जातात. या नियमाचे पालन करीत आयुक्त तुकाराम मंदिर मंगळवारी यासंदर्भात आदेश जारी केले निर्बंध हटविण्यासोबतच परिसरातील सील हटविण्यात आले. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निर्बंध हटविण्यात आलेला परिसर
लालगंज, दलालपुरा, प्रभाग २१ -सतरंजीपुरा झोन
गौतम नगर प्रभाग १०- मंगळवारी झोन
राजीव गांधी नगर प्रभाग ३- आशिनगर झोन
भालदारपुरा प्रभाग १९- गांधीबाग झोन
कुंदनलाल गुप्ता नगर प्रभाग ५-सतरंजीपुरा झोन
शांतिनगर प्रभाग २१- सतरंजीपुरा झोन