प्रियकराची दगाबाजी : शरीरसंबंध एकीशी लग्न दुसरीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 09:03 PM2019-07-27T21:03:06+5:302019-07-27T21:04:21+5:30

लग्नाच्या आणाभाका घेत तीन वर्षांपासून ३३ वर्षीय तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने दुसरीशी लग्न करण्याची तयारी चालविल्याचे लक्षात आल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी धोकेबाजी करणाऱ्या प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Beloved cheating: Sex with one marriage with another | प्रियकराची दगाबाजी : शरीरसंबंध एकीशी लग्न दुसरीशी

प्रियकराची दगाबाजी : शरीरसंबंध एकीशी लग्न दुसरीशी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रेयसीने लावला बलात्काराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाच्या आणाभाका घेत तीन वर्षांपासून ३३ वर्षीय तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने दुसरीशी लग्न करण्याची तयारी चालविल्याचे लक्षात आल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी धोकेबाजी करणाऱ्या प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गौरव रवी वानखेडे (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो श्रीगणेश रेसिडेन्सी, पंचतारा सोसायटी, मनीषनगर येथे राहतो.
गौरव एका खासगी विमा कंपनीत काम करतो. अंबाझरीतील ३३ वर्षीय तरुणीसोबत त्याचे पाच वर्षांपूर्वी ओळख झाली. ती ब्युटी पार्लरमध्ये काम करते. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. १३ जानेवारी २०१६ ला एका कार्यक्रमानंतर त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले, नंतर ते वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. घरची मंडळी बाहेर गेली की तो तिला आपल्या घरी न्यायचा, तर कधी दुसरीकडे नेऊन शरीरसंबंध जोडायचा. तीन वर्षांत त्यांनी पती-पत्नीसारखा एकमेकांवर हक्क दाखवला. दरम्यान, १६ जुलैला असेच ते सोबत असताना गौरवच्या मोबाईलमध्ये तिला त्याच्या साक्षगंधाचे फोटो दिसले. ते पाहून ती हादरली. तिने त्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो दुसऱ्याच तरुणीसोबत लग्नाच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्याने तरुणीने त्याला धमकावले. दोन दिवसांत लग्न करण्याचा हट्ट धरला.
तो ‘आऊट ऑफ रेंज’
लग्नाला होकार देऊन १० दिवसांपासून टाळाटाळ करणारा गौरव नागपुरातून पळून गेला. तो ‘आऊट ऑफ रेंज’ असल्याचे ध्यानात आल्याने तरुणीने बेलतरोडी पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौरव वानखेडेविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक मनपिया प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Beloved cheating: Sex with one marriage with another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.