इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ; मग शिक्षक शिक्षकेत्तरांना का नाही?

By मंगेश व्यवहारे | Published: May 27, 2023 05:33 PM2023-05-27T17:33:38+5:302023-05-27T17:34:00+5:30

Nagpur News राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्काळ दुसरा, तिसरा व चौथा हप्ता अदा करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी यांचेकडून करण्यात आली आहे.

Benefits to all other Government employees; So why not teachers and non-teachers? | इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ; मग शिक्षक शिक्षकेत्तरांना का नाही?

इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ; मग शिक्षक शिक्षकेत्तरांना का नाही?

googlenewsNext

मंगेश व्यवहारे
नागपूर : सातवा वेतन आयोग फरकाचा चवथा हप्ता जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करणेबाबत वित्त विभागांकडून २४ मे २०२३ रोजी जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे पहिला , दुसरा , तिसरा हप्ता मिळालेला आहे. परंतु राज्यातील शिक्षकशिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत शासन निर्णय निर्गमित होवूनही निधी अभावी दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला नाही. यामुळे चौथा हप्ता प्रदान करणेबाबतच्या शासन निर्णयाचा काय फायदा? असा सवाल शिक्षक, शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्काळ दुसरा, तिसरा व चौथा हप्ता अदा करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी यांचेकडून करण्यात आली आहे.

Web Title: Benefits to all other Government employees; So why not teachers and non-teachers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक