बेस्ट बेकरीला सील ठोकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:07 AM2021-04-21T04:07:57+5:302021-04-21T04:07:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी मंगळवारी जवाहरनगर येथील शारदा चौकातील बेस्ट बेकरीला ...

Best bakery sealed | बेस्ट बेकरीला सील ठोकले

बेस्ट बेकरीला सील ठोकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी मंगळवारी जवाहरनगर येथील शारदा चौकातील बेस्ट बेकरीला सील ठोकले. तसेच कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट न केल्याने माटे चौक येथील भारत पेट्रोल पंप चालकावर, मेडिकल चौकातील शुभम मेडिकोजला प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला.

एनडीएस पथकांनी १९ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई करून १ लाख ६० हजाराचा दंड वसूल केला. पथकांनी दिवसभरात ५८ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली. लक्ष्मीनगर झोनमध्ये दोन प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३० हजार रुपये दंड केला. धरमपेठ झोनमध्ये दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार रुपये दंड केला. हनुमाननगरमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. धंतोली झोनमध्ये १० प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार, नेहरूनगरच्या पथकाने सहा प्रतिष्ठानांची तपासणी केली. गांधीबाग झोनमध्ये ३० हजार, सतरंजीपुरा झोन पथकाने तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, आसीनगरमध्ये १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, लकडगंज झोनमध्ये १६ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये दंड केला, तर मंगळवारी झोनमध्ये ४ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Best bakery sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.