सुपारी ट्रान्सपोर्टरला १३.५४ लाखाने फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:59+5:302021-09-02T04:17:59+5:30

नागपूर : सुपारी ट्रान्सपोर्टरला पेट्रोल पंपाची डीलरशिप देण्याची बतावणी करून १३.५४ लाखाने त्याची फसवणूक केल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत ...

Betel nut transporter cheated by Rs 13.54 lakh | सुपारी ट्रान्सपोर्टरला १३.५४ लाखाने फसविले

सुपारी ट्रान्सपोर्टरला १३.५४ लाखाने फसविले

Next

नागपूर : सुपारी ट्रान्सपोर्टरला पेट्रोल पंपाची डीलरशिप देण्याची बतावणी करून १३.५४ लाखाने त्याची फसवणूक केल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे.

अनुप महेशचंद्र नगरिया रा. प्रीतम कॉम्प्लेक्स जुना भंडारा मार्ग यांचे ट्रान्सपोर्टनगरात मऊराणीपूर लॉजिस्टिक आहे. ते सुपारी आणि दुसऱ्या सामानाची वाहतूक करतात. २७ जानेवारीला हैदराबादच्या एका मोबाईलधारकाने नगरिया यांच्याशी संपर्क साधला. त्याने नगरिया यांना पेट्रोल पंपाची डीलरशिप देण्याची बतावणी केली. लायसन्स देण्याचा भरवसा देऊन नगरिया यांच्याकडून १३.५४ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याने नगरिया यांच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे समजताच नगरिया यांनी लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. नगरिया सुपारीच्या वाहतुकीशी निगडित असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. हा सायबर फसवणुकीचा गुन्हा आहे. आतापर्यंत सामान्य नागरिक आमिष दाखविल्यामुळे सायबर फसवणुकीचे शिकार ठरले आहेत. आता व्यापाऱ्यालाच शिकार बनविल्यामुळे पोलिसात खळबळ उडाली आहे. आरोपीला नगरिया यांचा मोठा व्यवसाय असल्याची माहिती होती, अशी शंका आहे. त्यामुळेच आरोपीने त्यांची फसवणूक केली. सुपारी व्यवसायाबद्दल शहरातील वातावरण चिघळलेले आहे. मागील आठवड्यात इतवारी स्टेशनच्या मालधक्क्यावर गुन्हेगारांनी मजुराला मारहाण करून एका सुपारी व्यावसायिकाकडून हप्ता वसूल केला होता. सत्यस्थिती बाहेर येऊ नये यासाठी सुपारी व्यावसायिकाने तक्रार दिली नाही. पोलिसांनी चौकशी केल्यानंतरही व्यावसायिकाने हप्ता वसुली केल्याचे सांगितले नाही.

..........

Web Title: Betel nut transporter cheated by Rs 13.54 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.