भारत-वेस्टइंडिज टी-ट्वेंटीवर सट्टा, तीन आरोपींना अटक
By योगेश पांडे | Updated: August 10, 2023 17:42 IST2023-08-10T17:41:20+5:302023-08-10T17:42:29+5:30
९ मोबाईल, ३ टीव्ही, लॅपटॉप, इलेक्ट्रीक स्टेशन बॉक्ससह ६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

भारत-वेस्टइंडिज टी-ट्वेंटीवर सट्टा, तीन आरोपींना अटक
नागपूर : भारत विरुद्ध वेस्टइंडिज टी-ट्वेंटी सामन्यादरम्यान सट्टा लावत लगवाडी-खायवाडी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
मंगळवारी गयाना येथे झालेल्या सामन्यादरम्यान लगवाडी खायवाडी करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी हिवरी नगर येथील ईडब्लूएस कॉलनीतील प्लॉट क्रमांक २१ येथे धाड टाकली असता तेथे तीन आरोपी आढळून आले. पोलिसांनी हार्दीक भरतभाई पटेल (३१) याला अटक केली. तो निशीत पटेल (२१, हिवरीनगर) आणि बजेरियातील तुषार व विकास शुक्ला यांच्या मदतीने लगवाडी-खायवाडी करत होता. त्याच्या ताब्यातून ९ मोबाईल, ३ टीव्ही, लॅपटॉप, इलेक्ट्रीक स्टेशन बॉक्ससह ६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हार्दीकला पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले, बलराम झाडोकर, मधुकर कोटोके, उमाळे, दीपक रिठे, दशरथ मिश्रा, विजय श्रिवास, विलास कोकाटे, पंकड हेडाऊ, कपिल तांडेकर, राहुल कुसरामे, दीपक लाकडे, अभय ढोणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.