गाेरेवाडाच्या नावाने बनावट वेबसाईटपासून सावध राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:34+5:302021-08-14T04:12:34+5:30

नागपूर : बाळासाहेब ठाकरे गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात सफारी करण्याचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढत आहे. याचा फायदा घेत बनावट वेबसाईट ...

Beware of fake websites in the name of Garewada | गाेरेवाडाच्या नावाने बनावट वेबसाईटपासून सावध राहा

गाेरेवाडाच्या नावाने बनावट वेबसाईटपासून सावध राहा

Next

नागपूर : बाळासाहेब ठाकरे गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात सफारी करण्याचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढत आहे. याचा फायदा घेत बनावट वेबसाईट तयार करून ऑनलाईन बुकिंगद्वारे लाेकांची फसवणूक केली जात आहे. अशा बनावट वेबसाईटवर लाेकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन उद्यान व्यवस्थापनाने केले आहे.

दिवसभराच्या सफारीसाठी जवळच्या गाेरेवाडा उद्यानाला पसंती दिली जात आहे. पर्यटकांचा वाढता कल बघता बनावट वेबसाईटद्वारे पर्यटकांची फसवणूक हाेत असल्याचे प्रकार समाेर आले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी गाेरेवाडा प्राणी उद्यानाच्या अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा, असे आवाहन गाेरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पी.बी. पंचभाई यांनी पत्रकातून केले आहे. दरम्यान, महापालिकेने जारी केलेल्या काेराेना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वाद्वारे गाेरेवाडा येथे सफारी व पर्यटनाला परवानगी दिली आहे. त्यानुसार यापुढे मंगळवार ते रविवारपर्यंत सकाळी ८.३० वाजतापासून सायंकाळी ४.४५ पर्यंत इंडियन सफारीसाठी उद्यान खुले राहणार आहे. या साेमवारी १६ ऑगस्ट राेजी शासकीय सुटीमुळे सफारी सुरू राहणार असून मंगळवारी मात्र बंद राहणार आहे. ऑनलाईन बुकिंगसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे उद्यानातील रस्ते अनुकूल राहत नसल्याने सध्या ऑनलाईन बुकिंग बंद ठेवण्यात आली असून सप्टेंबरपासून ही सेवा नियमित सुरू राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Beware of fake websites in the name of Garewada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.