डेंग्यू वाढतोय काळजी घ्या, कोरडा दिवस पाळा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:17+5:302021-07-15T04:07:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डेंग्यूचा आजार जिल्ह्यात वाढत असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा तसेच घरात पाणी ...

Beware of growing dengue, follow dry days () | डेंग्यू वाढतोय काळजी घ्या, कोरडा दिवस पाळा ()

डेंग्यू वाढतोय काळजी घ्या, कोरडा दिवस पाळा ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डेंग्यूचा आजार जिल्ह्यात वाढत असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा तसेच घरात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले आहे. विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्यानिमित्ताने राबवायच्या विविध योजना संदर्भात जिल्हा टास्क फोर्सची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कक्षात आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

१५ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. पंधरवडा राबवितांना कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचा अवलंब करावा. या कामासाठी आशा कार्यकर्तींना प्रत्येकी १०० रुपये मानधन देण्यात येणार असून आशा सेविकांनी घरोघरी जाऊन माहिती संकलित करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. दावल साळवे, अमित टंडन, डॉ. शैलजा गायकवाड, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी सुरेखा चौबे उपस्थित होते.

- अशा केल्या सूचना

- घरातील कुलर्स त्वरित काढावेत

- घरातील साचलेले पाणी काढून टाकावे

- आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा.

- स्वच्छतेवर जास्त भर द्यावा

- आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा

- हातांची स्वछता व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा.

- पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार व्यवस्थापन विषयक योग्य वर्तणूक बिंबवावी

- अतिसार असलेल्या बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्तीत जास्त होईल याची खबरदारी घ्यावी.

- सामाजिक व आरोग्य संस्था स्तरावर बालकांमधील अतिसाराच्या रुग्णांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक होत असल्याबाबत खात्री करावी.

- जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देण्यात यावे,

- ग्रामपंचायतमार्फत गावात डासअळी नाशक फवारणी तसेच धूर फवारणी व सार्वजनिक स्वच्छता करावी.

- रुग्णाची माहिती घेऊन तात्काळ उपाययोजना सुरू कराव्या.

- गटसभा, पोस्टर्स, पॉम्पलेट, बॅनर दवंडी, तसेच सोशल मीडियाद्वारे जनजागृती करावी

-संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यास तात्काळ रुग्णाचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठवा

Web Title: Beware of growing dengue, follow dry days ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.