'एप्रिल फूल' कराल तर खबरदार ! गृहमंत्र्यांचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:31 PM2020-03-31T21:31:34+5:302020-03-31T21:33:49+5:30

सध्या संपूर्ण देश ‘कोरोना’शी संघर्ष करत आहे. या स्थितीत ‘एप्रिल फूल’ करणे हे अयोग्य होईल. जर कुणी अशा प्रकारचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

Beware if you do 'April Fool'! Home Minister warned | 'एप्रिल फूल' कराल तर खबरदार ! गृहमंत्र्यांचा इशारा 

'एप्रिल फूल' कराल तर खबरदार ! गृहमंत्र्यांचा इशारा 

Next
ठळक मुद्देपोलीस करणार कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : १ एप्रिल ही तारीख म्हटली की एकमेकांना विविध माध्यमांतून ‘एप्रिल फूल’ बनविण्याचा प्रयत्न होतो. परंतु सध्या संपूर्ण देश ‘कोरोना’शी संघर्ष करत आहे. या स्थितीत ‘एप्रिल फूल’ करणे हे अयोग्य होईल. जर कुणी अशा प्रकारचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने अनेकदा ‘सोशल मीडिया’वरदेखील खोटेनाटे ‘पोस्ट’ फिरतात. यामुळे संभ्रमदेखील निर्माण होतो. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर एखादी लहानशी मस्करीदेखील मोठा तणाव निर्माण करु शकते. त्यामुळेच गृहमंत्र्यांनी वरील इशारा दिला आहे. ‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने एकमेकांसोबत मस्करी केली जाते. परंतु ‘कोरोना’चे संकट असताना असे करणे अनुचित ठरेल. काही लोकांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ व ‘सोशल मीडिया’वर असे प्रकार सुरूदेखील केले आहे. मात्र त्वरित त्याला थांबविण्यात यावे. जर असे कुणी केले तर संबंधितांवर पोलीस व ‘सायबर सेल’तर्फे कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Beware if you do 'April Fool'! Home Minister warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.