वीजचोरी करणाऱ्यांनो सावधान! होऊ शकतो कायमचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:12 AM2021-09-09T04:12:55+5:302021-09-09T04:12:55+5:30

श्याम नाडेकर नरखेड : वीज बिलाच्या बचतीकरिता अनेक ग्राहक वीज मीटरमध्ये फेरफार करतात. ही चोरी सापडल्यास महावितरणच्या नवीन मार्गदर्शक ...

Beware of power thieves! Can lead to permanent darkness | वीजचोरी करणाऱ्यांनो सावधान! होऊ शकतो कायमचा अंधार

वीजचोरी करणाऱ्यांनो सावधान! होऊ शकतो कायमचा अंधार

googlenewsNext

श्याम नाडेकर

नरखेड : वीज बिलाच्या बचतीकरिता अनेक ग्राहक वीज मीटरमध्ये फेरफार करतात. ही चोरी सापडल्यास महावितरणच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित व्यक्तीच्या घरात कायमचा अंधार होऊ शकतो. प्रसंगी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन आर्थिक दंड किंवा तुरुंगाची हवा खाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

नरखेड तालुक्यात वीज थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या मोठी असून, थकबाकी कोटीच्या घरात आहे. अनधिकृत वीज कनेक्शन असणाऱ्यांची संख्याही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. महावितरणकडून वीजचोरी पकडण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली असून, प्रत्येकाला वीजचोरी पकडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे अचानक तपासणी करून वीजचोरावर कारवाई करणे सुरू आहे.

वीज मीटर असताना वीजचोरी सापडली तर त्यांच्याकडून मागील अनेक वर्षांपासूनचे बिलाचे दीडपट वसूल केले जाऊ शकते. जे मीटर न घेता आकडा टाकून वीजचोरी करतात त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. पुन्हा नवीन मार्गदर्शक नियम आले असून, यात वेगवेगळे बदल झाले आहेत. हे सर्व नियम वीजचोरीसह वीज बिल थकविणाऱ्यांसाठीही आहेत. त्यामुळे ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

मीटर जप्ती व दंड

मीटरमध्ये फेरफार केल्यास लोडनुसार इलेक्ट्रिक बिलाच्या दीडपट रक्कम व घरगुती कनेक्शनकरिता २ हजार रुपये प्रति किलोवॅट आणि कमर्शियल ५ हजार रुपये प्रति किलोवॅट, कृषिपंपाकरिता १ हजार प्रति एचपी दंड. दंडाची रक्कम न भरल्यास मीटर जप्त होऊ शकते. आकडा टाकून वीजचोरी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जातो.

कधीही होऊ शकते तपासणी

विद्युत चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणचे पथक सदैव तयार असते. एखाद्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याची शंका आल्यास किंवा गुप्त माहिती मिळाल्यास पथक व्यक्ती किंवा व्यावसायिकांवर छापा टाकून मीटरची तपासणी करतात.

वीजमीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई (बॉक्स)

एप्रिल १९ ते मार्च २०२०

नरखेड उपविभाग- ४५

सावरगाव उपविभाग- ६८

एप्रिल २० ते मार्च २०२१

नरखेड उपविभाग- २६

सावरगाव उपविभाग-२२

एप्रिल ते ऑगस्ट २०२१

नरखेड उपविभाग- ४२

सावरगाव उपविभाग - १८

---

वीजचोरी कायद्याने गुन्हा आहे. दंड व शिक्षेची तरतूद आहे. ग्राहकांनी कारवाईमुळे होणारे आर्थिक नुकसान व होणारी बदनामी टाळावी. थकबाकी बिलाचा भरणा करावा. कारवाई करणे ही अपरिहार्यता आहे.

अभिजित घोडे

उप कार्यकरी अभियंता, उपविभाग नरखेड

Web Title: Beware of power thieves! Can lead to permanent darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.