"सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग"चा मॅसेज आल्यास सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:55+5:302021-06-01T04:06:55+5:30

सायबर गुन्हेगाराचा डाव : तुमची फसवणूक होऊ शकते लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तुमचे अद्याप व्हेरिफिकेशन झालेले नाही. ते ...

Beware of "Seam Verification Pending" message! | "सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग"चा मॅसेज आल्यास सावधान !

"सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग"चा मॅसेज आल्यास सावधान !

Next

सायबर गुन्हेगाराचा डाव : तुमची फसवणूक होऊ शकते

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तुमचे अद्याप व्हेरिफिकेशन झालेले नाही. ते तातडीने करायचे आहे. तुम्ही तत्काळ विचारलेली माहिती द्या. अन्यथा तुमचे २४ तासांत सीमकार्ड ब्लॉक होईल, असा तुम्हाला अचानक फोन किंवा मेसेज येऊ शकतो. हा फोन किंवा मॅसेज म्हणजे तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याची सायबर गुन्हेगाराने केलेली तयारी होय. त्यामुळे सावधान !

असा कोणताही फोन आला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.

सायबर गुन्हेगारीचे नवनवे प्रकार पुढे येत आहे. आधी लॉटरी लागल्याचे आणि नोकरीचे आमिष दाखविणारे फोन करून सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्तीची फसवणूक करायचे. अलीकडे सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी नवनवीन शक्कल लढविणे सुरू केले आहे. कधी बँकेच्या नावावर, कधी मोबाइल कंपन्यांच्या नावावर, तर कधी कोणत्या नावावर ते फोन करतात आणि बेमालूमपणे समोरच्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे सावधान !

तुम्हाला कोणत्याही मोबाइल कंपनीकडून बोलतो, असे सांगणारा फोन अथवा मॅसेज आला आणि त्याने तुमचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, असे सांगून तुमचे सीमकार्ड ब्लॉक होईल, असा धाक दाखवला तर घाबरू नका. फोन करणाऱ्याला कसलाही प्रतिसाद देऊ नका. त्याने पाठविलेली कोणतीही लिंक अथवा ॲप डाऊनलोड करू नका. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही.

----

मोबाइलवरून फसवणूक झाल्याच्या तक्रारी

सायबर गुन्हेगाराने मोबाइलवरून फोन करून फसविल्याचे प्रकार नागपूर शहरात नियमित घडत आहेत. २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांच्या कार्यकाळात सायबर गुन्हेगारीच्या सुमारे दहा हजार तक्रारी आल्या. त्यातील सुमारे दोन हजार तक्रारी मोबाइलवरून फसविल्याच्या आहेत.

----

अशी घ्या काळजी

कोणत्याही अनोळखी व्यक्तीने कसलेही आमिष अथवा भीती दाखविली, तर त्याला भीक घालू नका. कोणत्याच प्रकारची लिंक अथवा ॲप डाऊनलोड करू नका.

---

सुरक्षा आपल्याच हातात

ज्याप्रमाणे मोबाइल आपल्या हातात असतो. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारापासून आपली सुरक्षा करणेही आपल्याच हातात आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला आपली व्यक्तिगत माहिती देऊ नका. कोणतीही लिंक डाऊनलोड करण्यापूर्वी आपण फसविले जाणार तर नाही ना, याचा विचार करावा. शक्यतो व्हेरिफिकेशन करण्यासाठी प्रत्यक्ष त्या कंपनीच्या कार्यालयात जावे. छोटीशी सतर्कता बाळगल्यास मोठा गुन्हा करू शकतो.

--अशोक बागुल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

सायबर पोलीस स्टेशन, नागपूर

---

Web Title: Beware of "Seam Verification Pending" message!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.