भगवंत मान हात उंचावून गेले, नागपूर विमानतळावर ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड
By कमलेश वानखेडे | Published: November 14, 2023 04:45 PM2023-11-14T16:45:00+5:302023-11-14T16:46:18+5:30
भगवंत मान हे विमानतळाबाहेर आले व हात उंचावून निघून गेले. यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
नागपूर : मध्यप्रदेश निवडणुकीच्या प्रचारत सहभागी होण्यासाठी आम आदमी पार्टीचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केडरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत माननागपूर विमानतळावर येऊन रवाना होणार होते. मात्र, केजरीवाल आलेच नाहीत. तर भगवंत मान हे विमानतळाबाहेर आले व हात उंचावून निघून गेले. यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान नागपूर विमानतळाबाहेर आले. तेथून त्यांचा ताफा छिंदवाडासाठी रवाना झाला. ‘आप’च्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करता येईल असा मेसेज देण्यात आला होता. त्यामुळे कार्यकर्ते उत्साहात विमानतळावर जमले होते. मात्र, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कार्यकर्त्यांशी कुठलाही संवाद साधला नाही. हात उंचावत ते मध्य प्रदेश कडे रवाना झाले. त्यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.