सरसंघचालकांकडूनदेखील हैदराबादचा उल्लेख भाग्यनगरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 10:02 PM2021-12-22T22:02:17+5:302021-12-22T22:03:57+5:30

Nagpur News बुधवारी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील ‘मी भाग्यनगरला गेलो होतो व जानेवारीतदेखील भाग्यनगरलाच जाणार’ असे म्हणत हैदराबाद असा नामोल्लेख करण्याचे टाळले.

Bhagyanagar is also mentioned by Mohan Bhagwat! | सरसंघचालकांकडूनदेखील हैदराबादचा उल्लेख भाग्यनगरच!

सरसंघचालकांकडूनदेखील हैदराबादचा उल्लेख भाग्यनगरच!

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन वर्षारंभी संघाची समन्वय बैठक हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर

 

नागपूर : तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ५ ते ७ जानेवारी या कालावधीत ही बैठक हैदराबादला होणार आहे; परंतु संघातर्फे शहराचा नामोल्लेख भाग्यनगर असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बुधवारी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील ‘मी भाग्यनगरला गेलो होतो व जानेवारीतदेखील भाग्यनगरलाच जाणार’ असे म्हणत हैदराबाद असा नामोल्लेख करण्याचे टाळले.

२०१४ साली सत्तेत आल्यापासून भाजपशासित अनेक राज्यांतील शहरांची नावे बदलण्यात आली. भाजपच्या अनेक नेत्यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू असे म्हटले होते. याला हैदराबादचे स्थानिक नेते तसेच एमआयएमकडून जोरदार विरोध करण्यात आला. संबंधित मुद्दा काहीसा मागे पडला असताना संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांच्या ट्विटमुळे परत चर्चेला आला. संघातर्फे नियमितपणे विविध संघटनांची समन्वय बैठक घेण्यात येते. पुढील बैठक भाग्यनगर येथे होईल, असे नमूद केल्याने राष्ट्रीय पातळीवर यावर विविध प्रतिक्रिया समोर आल्या.

Web Title: Bhagyanagar is also mentioned by Mohan Bhagwat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.