भंडाऱ्याचे भाजप खासदार नाना पटोले आज खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:39 PM2017-12-08T12:39:24+5:302017-12-08T12:39:54+5:30

भंडाऱ्याचे भाजप खासदार नाना पटोले हे आज आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. नाना पटोले हे सध्या दिल्लीत असून आज त्यांची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

Bhandara's BJP MP Nana Patole is likely to resign as MP today | भंडाऱ्याचे भाजप खासदार नाना पटोले आज खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता

भंडाऱ्याचे भाजप खासदार नाना पटोले आज खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देस्वपक्षावरची नाराजी कृतीत उतरणार?

आॅनलाईन लोकमत
नागपूर:
भंडाऱ्याचे भाजप खासदार नाना पटोले हे आज आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. नाना पटोले हे सध्या दिल्लीत असून आज त्यांची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
नाना पटोले यांनी २००८ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. पुढे २०१४ मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा मतदारसंघात पराभव केला होता. मात्र अलीकडे ते स्वपक्षाच्या धोरणांवर नाराज आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करीत आहेत. सोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करीत आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते.

Web Title: Bhandara's BJP MP Nana Patole is likely to resign as MP today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.