भंते सुरेई ससाई व आ. ह. साळुंखे यांना प्रबुद्ध भारत शांतता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 08:13 PM2022-10-03T20:13:57+5:302022-10-03T20:20:36+5:30
Nagpur News भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना त्यांच्या समाजातील भरीव योगदानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नागपूर : त्रिरत्न बौद्ध महासंघ व नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना त्यांच्या समाजातील भरीव योगदानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या ५ तारखेला कामठी रोडवरील नागलोक येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
भदंत आर्य सुरेई ससाई यांचा जन्म १९३५ मध्ये जपान येथे झाला. ते १९६८ ला भारतात आले आणि येथेच स्थायिक झाले. १९९२ ला मनसर येथे त्यांनी अवशेष उत्खननाचे कार्य सुरु केले. तिथे भव्य बौद्ध अवशेष निघाले. सध्या ते दीक्षाभूमी येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच डॉ. आ. ह. साळुंखे यांचे योगदानसुद्धा प्रशंसनीय आहे. बहुजन विकासाचा वसा वैज्ञानिक दृष्टिकोन बुद्ध परंपरा चार्वाक, मनुस्मृती, महाभारत, शिवचरित्र, संत साहित्याचा अतिशय अभ्यास विचारशील, चिंतनशील, चिकित्सक शैक्षणिक चिंतन, धर्म चिकित्सा ऐतिहासिक दृष्टिकोन आदी त्यांचे भरीव योगदान आहे.