शनि शिंगणापूरच्या शनि मंदिराचे सरकारीकरण रद्द करा- भरतशेठ गोगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 12:49 PM2018-07-17T12:49:54+5:302018-07-17T12:54:18+5:30

सरकारचा निर्णय हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा

bharatsheth gogavale Upset With Maharashtra Govt's Decision to Take Charge of Shani Shingnapur Temple | शनि शिंगणापूरच्या शनि मंदिराचे सरकारीकरण रद्द करा- भरतशेठ गोगावले

शनि शिंगणापूरच्या शनि मंदिराचे सरकारीकरण रद्द करा- भरतशेठ गोगावले

Next

नागपूर : शासनाने शनि शिंगणापूर येथील शनि मंदिराचे सरकारीकरण करण्याचा घेतलेला निर्णय हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. या मंदिरासह राज्यातील हिंदूंच्या सर्व मंदिरांचे सरकारीकरण रद्द करण्याची मागणी महाड-रायगडचे शिवसेना आमदार भरतसेठ गोगावले यांनी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली. 

सरकारने फक्त हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण चालविले आहे, त्यात एकही मशीद, चर्चचा समावेश नाही. शिवाय ही मंदिरे ताब्यात घेतल्यानंतर तेथील भ्रष्टाचार कमी न होता अधिक वाढला असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यात मुसलमानांचे अनेक दर्गे, मशिदी व ख्रिश्चनांची अनेक चर्चेस आहे. त्यांचे कोट्यवधींचे उत्पन्न आहे. त्यांचेही सरकारीकरण करावे अशी आमची मागणी असल्याचे ते पुढे म्हणाले.

Web Title: bharatsheth gogavale Upset With Maharashtra Govt's Decision to Take Charge of Shani Shingnapur Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.