भरधाव क्रुझर ट्रकवर आदळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:11+5:302021-02-05T04:38:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : दुचाकीचालकास वाचविण्याच्या नादात वेगात असलेली क्रुझर राेडलगत उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. त्यातच ताबा सुटल्याने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : दुचाकीचालकास वाचविण्याच्या नादात वेगात असलेली क्रुझर राेडलगत उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. त्यातच ताबा सुटल्याने दुचाकीचालक राेडवर काेसळला. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून, क्रुझरमधील प्रवासी किरकाेळ जखमी झाले. ही घटना काटाेल-वरूड मार्गावरील जलालखेडा (ता. नरखेड) येथे साेमवारी (दि. १) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
सखाराम ऊर्फ ज्ञानेश्वर पांडुरंग सावरकर (४०, रा. मेंढला, ता. नरखेड) असे गंभीर जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. एमएच-३२/सी-६७७० क्रमांकाची क्रुझर प्रवासी घेऊन जलालखेड्याहून भारसिंगीच्या दिशेने जात हाेती. त्याच राेड ओलांडण्यासाठी सखाराम एमएच-४०/पीबी-७८८७ क्रमांकाच्या माेटरसायकलने आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली क्रुझर राेडलगत उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.
त्याच वेळी सखाराम माेटरसायकलसह राेडवर काेसळला. त्यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्याला स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. क्रुझरची धडक लागताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
...
गतिराेधक आवश्यक
वरूड-जलालखेडा-काटाेल मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आल्यानंतर या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. हा मार्ग जलालखेड्याच्या मध्यभागातून गेला असून, बाजारपेठ असल्याने दाेन्ही बाजूंनी दुकाने आहेत. जलालखेडा येथे दुभाजक असूनही अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिराेधक तयार करणे अनिवार्य झाले आहे.