भरधाव टिप्परने महिलेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:10 AM2021-08-27T04:10:59+5:302021-08-27T04:10:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - भरधाव टिप्परचालकाने समोर असलेल्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीवर बसलेली महिला खाली पडली. तिला ...

Bhardhaw tipper crushed the woman | भरधाव टिप्परने महिलेला चिरडले

भरधाव टिप्परने महिलेला चिरडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - भरधाव टिप्परचालकाने समोर असलेल्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीवर बसलेली महिला खाली पडली. तिला चिरडून टिप्परचालक पुढे पळून गेला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानेवाडा रिंग रोडवर गुरुवारी दुपारी ४.१५च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यामुळे घटनास्थळी काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

सरिता सहदेव कापसे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. हुडकेश्वरमधील सुदर्शननगरात पुंडलिकराव अवजे यांच्या घरी सरिता कापसे भाड्याने राहत होत्या. गुरुवारी दुपारी अवजे यांची मुलगी करुणा राऊत हिच्यासोबत सरिता नरेंद्रनगर चाैकाकडे ॲक्टिव्हा दुचाकीने जात होत्या. शताब्दी चाैकानंतर तुकाराम सभागृहाजवळचा सिग्नल ओलांडताच टिप्परने करुणाच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे मागे बसलेल्या सरिता आणि करुणा दोघीही दोन बाजूंना पडल्या. सरिताला टिप्परने चिरडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघाताच्या ठिकाणचे दृश्य अतिशय विदारक होते. अनेकजण ते पाहू शकत नव्हते. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या अपघाताची माहिती कळताच अजनीचे ठाणेदार विजय तलवारे आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचले. त्यांनी सरिता कापसे यांचा मृतदेह तेथून मेडिकलकडे रवाना केला.

अपघातामुळे तुकाराम सभागृहासमोर मोठी गर्दी जमल्याने वाहतुकीला अडसर निर्माण झाला होता. पोलिसांनी तेथून बघ्यांना हटविले आणि वाहतूक सुरळीत केली.

----

पती आणि मैत्रिणीला मोठा धक्का

डोळ्यांदेखत सोबत असलेल्या मैत्रिणीचा एवढा भीषण अपघात झाल्याने करुणा यांना जबर मानसिक धक्का बसला. बऱ्याच वेळेपर्यंत त्यांना काही बोलवतच नव्हते. नंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून सरिता यांच्या पतीला बोलवून घेण्यात आले. सरिता यांचे पती कॅटरर्सचा व्यवसाय करतात. त्यांनाही पत्नीच्या भीषण अपघातामुळे जबर मानसिक धक्का बसला होता.

----

Web Title: Bhardhaw tipper crushed the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.