भरधाव कार उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:08 AM2021-01-04T04:08:28+5:302021-01-04T04:08:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बाजारगाव : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली कार राेडलगतच्या नालीत जाऊन उलटली. त्यात कारमधील एक जण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बाजारगाव : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली कार राेडलगतच्या नालीत जाऊन उलटली. त्यात कारमधील एक जण गंभीर तर तिघे किरकाेळ जखमी झाले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील शिवा फाटा परिसरात रविवारी (दि. ३) सकाळी घडली.
अनिकेत देशमुख, रा. अमरावती असे गंभीर तर कारचालक शिवराज काकडे (२७, रा. बुलडाणा), रवींद्र काकडे (६५, रा. बुलडाणा) व यश साखरे, रा. अमरावती अशी किरकाेळ जखमींची नावे आहेत. हे सर्व जण अनिकेत देशमुख याचे लग्न पक्के करण्यासाठी एमएच-२८/एएन-०२२० क्रमांकाच्या कारने बुलडाणाहून नागपूरला जात हाेते.
ते बाजारगाव नजीकच्या शिवा फाटा परिसरात पाेहाेचताच चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटला आणि ती कार राेडलगत नालीत जाऊन उलटली. त्यात अनिकेतला गंभीर तर इतरांना किरकाेळ दुखापत झाली. अपघात हाेताच परिसरातील नागरिकांनी जखमींना कारमधून काढले व बाजारगाव येथील खासगी दवाखान्यात आणले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास पाेलीस कर्मचारी साेनवणे करीत आहेत.