मध्य प्रदेशातून येणाऱ्या रुग्णांसाठी बनणार भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:04+5:302021-09-09T04:13:04+5:30
नागपूर : मध्य प्रदेशातून नागपुरात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी येतात. हे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सुविधेसाठी नागपुरात भवन बनविण्याचा ...
नागपूर : मध्य प्रदेशातून नागपुरात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी येतात. हे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सुविधेसाठी नागपुरात भवन बनविण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गौतम यांनी दिली. मध्य प्रदेश व महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय साधून भवनासाठी जमीन मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी मध्य भारत विकास संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी व माजी महापौर शेखर सावरबांधे उपस्थित होते. विकास संघाचे संयोजक रविनीश पांडे यांनी मध्य प्रदेशातून येणाऱ्या रुग्णांच्या समस्या मांडत भवन बनविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला मनीषा अतकरे, राकेश तिवारी, कमलेश ठाकूर, अमित पांडे, मोनू, गुलशन मुनियार, विवेक मिश्रा, कुंजलेश्वर पांडे, दयाशंकर पटेल, राजा गौतम, पिंटू दुबे, शंकर शुक्ला, नागेश्वर पांडे उपस्थित होते.