भिडे-एकबोटेविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 07:46 PM2018-01-15T19:46:55+5:302018-01-15T19:48:09+5:30
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड असलेल्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा आंबेडकरी जनआंदोलन कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड असलेल्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा आंबेडकरी जनआंदोलन कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
या हल्ल्यानंतर आंबेडकरी समाजाने आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्या आंदोलनात आंबेडकरी कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे. कोरेगाव भीमा येथील शौर्य स्तंभाच्या संरक्षणासाठी शासनाने पोलिसांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
या धरणे आंदोलनात हरिदास टेंभुर्णे, विनायक जामगडे, अमृत गजभिये, निरंजन वासनिक, घनश्याम फुसे, दिनेश गोडघाटे, एकनाथ ताकसांडे, प्रकाश कुंभे, डॉ. शिवशंर बनकर, शंकर मानके, प्रा. राहुल मून, प्रा. प्रदीप बोरकर, हंसराज मेश्राम, दिनेश अंडरसहारे, यशवंत तेलंग, विश्वनाथ खांडेकर, अशोक बोंदाडे, रावसाहेब ढेपे, गोपीचंद आंभोरे, आनंद सायरे, भीमराव फुसे, नीलेश टेंभुर्णे, उमेश टेंभुर्णे, डॉ. चरणदास जनबंधू, सुधाकर ठवळे, भागवत डोंगरे, राजा नगराळे, धनराज शेंडे, अरुण लाटकर, भीमराव चिकाटे, मिलिंद मेश्राम आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.