भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त नागपुरात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:23 AM2020-01-02T00:23:00+5:302020-01-02T00:25:28+5:30
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या युद्धाचे स्मरण करीत आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या युद्धाचे स्मरण करीत आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. विविध राजकीय, सामाजिक संस्था, संघटनांनी संविधान चौक व दीक्षाभूमीवर पोहचून युद्धात शहीद झालेल्या महार सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मोठ्या संख्येने विविध संघटनांचे कार्यकर्ते अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बेझनबाग मैदान येथे मानवंदना
भीमा कोरेगांव येथील अभिमानास्पद लढ्यात केवळ ५०० महार सैनिकांना २८ हजार पेशवे सैनिकाचा दिनांक १ जानेवारी, १८१८ रोजी पराभव केला होता. त्या भीमा परिक्रमाला २०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्त बुधवारी बेझनबाग मैदान कामठी रोड येथे बेझनबाग जरीपटका मित्र मंडळाच्यावतीने भीमा कोरेगांव क्रांतीस्तंभाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. भदंत नागाप्रकाश यांचे अध्यक्षतेखाली मानवंदना देण्यात आली. यावेळी समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा व भिक्कू संघाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुध्दाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुध्दवंदना घेण्यात आली. याप्रसंगी भदंत नागाप्रकाश, नगरसेवक किशोर जिचकार, मनपाचे माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, नरेश महाजन, सुधा जनबंधू, राजेंद्र सुखदेवे, राजेंद्र कांबळे, दीप्ती नाईक, मनिषा राऊत, सुरेश नारनवरे आदींनी भीमा कोरेगांव लढ्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना नगरसेवक किशोर जिचकार यांनी आपल्या फंडातून भीमा कोरेगाव स्मृतिस्तंभ उभारण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमासाठी डॉ.अनमोल टेंभूर्णे, शेखर खांडेकर, किशोर टेंभूर्णे, पप्पू ठवरे, राजू डोंगरे, संजय गोंडाणे, अशोक मेश्राम, बाळू जांभूळकर, धम्मपाल लांजेवार, चंदू गजभिये, अवित धारगावे, सुरेश पाटील, आनंद बोधनकर, धीरज कडबे, शिशुपाल कोल्हटकर, राजेश मेश्राम आदी भीम सैनिकांनी परिश्रम घेतले.
आशीर्वादनगर, गोधनी रोड
आशीर्वादनगर, गोधनी रोड येथे अनुयायी व कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे स्मरण क रीत युद्धातील शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. पंचशील ध्वजाला यावेळी अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात अरविंद मेश्राम, हरीश पाटील, यशवंत वालदे, किशोर लांजेवार, जनकलाल धनेकर, विजय उरकुडे, चंद्रशेखर खोब्रागडे, सुरेश रामटेके, यादव लांजेवार, के.जी. लांजेवार, चंद्रपाल टेंभुर्णे, टी.एन. गजभिये, पराग गजभिये, टी. आर. माटे आदी उपस्थित होते.
समता सैनिक दल
समता सैनिक दल, दीक्षाभूमी मुख्यालयाच्यावतीने भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त संविधान चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दलाच्या सैनिकांनी परिसरात बँड पथकासह पथसंचालन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मालार्पण करून अभिवादन केले तसेच भीमा कोरेगाव युद्धात शहीद झालेल्या महार सैनिकांना श्रद्धांजली दिली. युथ ऑफ नागपूर बुद्धिष्ट यूनिट, सदर यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विजयी स्तंभाला बँड पथकाच्या गजरात मानवंदना देण्यात आली. परेडचे संचालन माजी जेलर सैनिक आनंद पिल्लेवान व अनिल इंगळे यांनी केले. टारझन दहीवले व तुफान कांबळे यांनी बँड पथकाचे संचालन केले. आयोजनात गौतम पाटील, अरूण भारशंख, निखिल कांबळे, अविनाश भैसारे, आनंद तेलंग, राजेश लांजेवार, ऊदयकुमार टेंबूर्णीकर, बंडू कुंभारे, प्रसन्न काळे आदींचा सहभाग होता.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच
बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्यावतीने संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा करण्यात आला. शहीद सैनिकांना मानवंदना देण्यात आली. यावेळी नगरसेविका वंदना भगत, भीमराव फुसे, प्रवीण निखाडे, रत्ना मेंढे, लीला आंबुलकर, कांता ढेपे, सुनंदा रामटेके, श्रद्धा निखाडे, नरेंद्र चव्हाण, आनंद सायरे, शंकर बागडे, पराग निखाडे, भानुदास कुंभे आदी उपस्थित होते.