ड्रॅगन पॅलेस टेम्पलवर उसळला भीमसागर; उपमुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट
By जितेंद्र ढवळे | Updated: October 24, 2023 16:14 IST2023-10-24T16:13:56+5:302023-10-24T16:14:26+5:30
दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे येणाऱ्या सर्व अनुयायांचे स्वागत करीत उपमुख्यमंत्र्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

ड्रॅगन पॅलेस टेम्पलवर उसळला भीमसागर; उपमुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट
नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे येणाऱ्या सर्व अनुयायांचे स्वागत करीत उपमुख्यमंत्र्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठी हे शहर जगाच्या नकाशावर आले असल्याचे यावेळी ते म्हणाले. आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी यावेळी उपस्थित होते.