भोई समाज, सर्व उपजातींना ‘एससी’ वर्गाचे आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:20 PM2018-07-09T23:20:36+5:302018-07-09T23:21:32+5:30
भोई समाज संघटनेच्या वतीने समाजाला आणि सर्व उपजातींना अनुसूचित जाती वर्गाचे आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील तलाव मत्स्य व्यवसायासाठी द्यावे यासह इतर मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम धंतोली येथून मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भोई समाज संघटनेच्या वतीने समाजाला आणि सर्व उपजातींना अनुसूचित जाती वर्गाचे आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील तलाव मत्स्य व्यवसायासाठी द्यावे यासह इतर मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम धंतोली येथून मोर्चा काढण्यात आला.
मोर्चेकरींनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मासोळ्या आणल्या आणल्या होत्या. मॉरेस कॉलेज टी पॉर्इंट येथे पोलिसांनी हा मोर्चा अडविला. मोर्चात भोई समाज बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत मासे हातात घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी मागण्यासंदर्भात १५ दिवसात मुंबईत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.या मोर्चाचे नेतृत्व भाई नानासाहेब लकारे, राजू मामुलवार, प्रा. राजेश ढवळे, बंडु सुरजुसे, बाबुराव बावणे, कैलाश केवदे यांनी केले.नॉन क्रिमिलेयरची अट रद्द करावी,कुरुळा ता. कंधार जि. नांदेड येथे समाजातील मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,नांदेड शहरातील चिखलवाडी भोईगल्लीच्या जागेचा प्रश्न सोडवावा,समाजातील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहाची व्यवस्था करावी आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.