भुवनेश्वरी एस. नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 09:48 PM2020-10-23T21:48:47+5:302020-10-23T21:50:01+5:30
Nagpur Smart City CEO Bhubaneswari S Nagpur Newsभंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची नियुक्ती नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या रिक्त पदावर करण्यात आली आहे. सध्या मनपा उपायुक्त व स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची नियुक्ती नागपूरस्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या रिक्त पदावर करण्यात आली आहे. सध्या मनपा उपायुक्त व स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार आहे.
आठ महिन्यापूर्वी रामनाथ सोनवणे यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला होता. परंतु मनपातील सत्तापक्षााने मुंढे यांनी हे पद बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप करून या संदर्भात तक्रार केली होती. तसेच मुंढे यांनी स्मार्ट सिटी संदर्भात घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेतले होते. अखेर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत महेश मोरोणे यांच्याकडे प्रभार सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.