भूषण दडवे ‘दीक्षाभूमी सेवक’ पुरस्काराने सन्मानित

By admin | Published: May 30, 2017 01:48 AM2017-05-30T01:48:52+5:302017-05-30T01:48:52+5:30

दीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे ‘अ’वर्ग तीर्थक्षेत्र जाहीर करावे तसेच दीक्षाभूमीवर १४ एप्रिलला पोस्टाचे तिकीट काढावे,...

Bhushan Daveve honored with Dikshitbhamar Sevak | भूषण दडवे ‘दीक्षाभूमी सेवक’ पुरस्काराने सन्मानित

भूषण दडवे ‘दीक्षाभूमी सेवक’ पुरस्काराने सन्मानित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे ‘अ’वर्ग तीर्थक्षेत्र जाहीर करावे तसेच दीक्षाभूमीवर १४ एप्रिलला पोस्टाचे तिकीट काढावे, या दोन्ही मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे दलित मित्र भूषण दडवे यांना महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघाच्यावतीने ‘दीक्षाभूमी सेवक ’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रविभवन सभागृहात पार पडलेल्या या समारंभाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, दलित मित्र संघाचे अध्यक्ष नरोत्तम चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे विभागीय आयुक्त माधव झोड, कामगार नेते हरीश निंबाळकर उपस्थित होते. राज्याचे सरचिटणीस योगेश वागदे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ममता गेडाम, समाज उत्थान पुरस्कार मिळालेल्या चिमणकर, डॉ. महादेव नगराळे यांचासुद्धा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Bhushan Daveve honored with Dikshitbhamar Sevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.