भूषण शिंगणे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी निवड
By admin | Published: September 24, 2015 03:28 AM2015-09-24T03:28:38+5:302015-09-24T03:28:38+5:30
महापालिकेतून नासुप्रवर विश्वस्त पदासाठी भाजपचे नगरसेवक भूषण शिंगणे यांची सर्वसाधारण सभेत बुधवारी एकमताने निवड करण्यात आली.
नागपूर : महापालिकेतून नासुप्रवर विश्वस्त पदासाठी भाजपचे नगरसेवक भूषण शिंगणे यांची सर्वसाधारण सभेत बुधवारी एकमताने निवड करण्यात आली. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी त्यांचे नाव सुचविले. विरोधी पक्षाकडून या पदासाठी कुणाचेही नाव न आल्याने महापौर प्रवीण दटके यांनी शिंगणे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केर्लंी.
शिंगणे पश्चिम नागपुरातील बोरगाव प्रभागाचे नगरसेवक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. मागील ३५ वर्षात भाजपात ते विविध पदावर कार्यरत होते. डॉ. रवींद्र भोयर यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा दिल्याने नगरसेवकातून निवडून पाठवावयाचे विश्वस्ताचे पद रिक्त होते. या पदासाठी भाजपमध्ये अनेक इच्छूक होते. या दृष्टीने मोर्चेबांधणीही केली होती. परंतु या पदावर शिंगणे यांचीच निवड होणार असल्याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ ने प्रकाशित केले होते. त्यांच्या निवडीमुळे याला पुष्टी मिळाली आहे.
विश्वस्त म्हणून शिंगणे यांच्या नावाची घोषणा होताच त्यांनी हात जोडून सभागृहाचे आभार व्यक्त केले. सभागृहाबाहेर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही. अनधिकृत ले-आऊ टचा विकास करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)