भूषण शिंगणे यांचा नासुप्र विश्वस्तपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:07 AM2021-03-01T04:07:55+5:302021-03-01T04:07:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या दोन वर्षात प्रभागातील विकास कामे ठप्प असल्याने नागरिकात नाराजी आहे. त्यात पुढील वर्षात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या दोन वर्षात प्रभागातील विकास कामे ठप्प असल्याने नागरिकात नाराजी आहे. त्यात पुढील वर्षात महापालिकेची निवडणूक आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपात पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. याचा विचार करता सामाजिक व जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न मनपातील सत्तापक्षाने चालविला आहे. यातूनच भाजपचे नगरसेवक व नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी सत्तापक्षातील दुसऱ्याला संधी दिली जाणार आहे.
मनपातील सत्तापक्ष नेते बदलण्यात आले आहेत. स्थायी समिती अध्यक्ष व विषय समिती सभापतींच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. सभापतींची सोमवारी निवड केली जाणार आहे, तर झोन सभापतींची निवड करण्यात आली आहे. परिवहन सभापतीही बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नासुप्र विश्वस्त व परिवहन सभापतींची पुढील सभागृहात घोषणा होण्याची शक्यता आहे.