अतिरिक्त पोषण आहारात च्यवनप्राशऐवजी देणार बिकॉझिंकच्या टॅबलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 07:51 PM2022-03-21T19:51:40+5:302022-03-21T19:52:08+5:30

Nagpur News जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा मातांसाठी अतिरिक्त आहार बिकॉझिंकच्या टॅबलेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Bicozinc tablets will give extra nutrition in the diet instead of Chyavanprash | अतिरिक्त पोषण आहारात च्यवनप्राशऐवजी देणार बिकॉझिंकच्या टॅबलेट

अतिरिक्त पोषण आहारात च्यवनप्राशऐवजी देणार बिकॉझिंकच्या टॅबलेट

Next
ठळक मुद्देगरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी पोषक

नागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने जिल्हा वार्षिक योजना (अनु.जाती उपयोजना आदिवासी क्षेत्र ) उपयोजनांतर्गत किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा मातांसाठी अतिरिक्त आहार बिकॉझिंकच्या टॅबलेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अतिरिक्त आहाराच्या रूपात च्यवनप्राश पुरविण्यावर विभागाने शिक्कामोर्तब केले होते; मात्र तांत्रिक मान्यता न मिळाल्याने च्यवनप्राश ऐवजी बिटकॉझिंकच्या टॅबलेट देण्यात येणार आहेत.

महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०२१-२२ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजना (अनु.जाती उपयोजना एससीपी) अंतर्गत ५० लाख, आदिवासी क्षेत्र उपयोजना (टीएसपी) अंतर्गत १० लाख, ओटीएसपी अंतर्गत १० लाख व एमएडीए अंतर्गत १० लाख अशा ८० लाखांच्या निधीतून अतिरिक्त आहाराची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या इएसआयसी नवी दिल्ली कार्यालयाकडून ई-निविदा दरकरार मंजुरी प्राप्त असलेल्या कंपनीला पुरवठा करण्यावर सदस्यांनी सहमती दर्शविली आहे. लवकरच टॅबलेटचा पुरवठा करण्यात येणार आहे.

- अतिरिक्त पोषण आहाराच्या रूपात देण्यात येणाऱ्या टॅबलेट या आरोग्य विभागातून प्रमाणित करण्यात आल्या आहेत. गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले घटक या टॅबलेटमध्ये असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी पोषक आहे.

उज्ज्वला बोढारे, सभापती, महिला व बाल कल्याण विभाग.

Web Title: Bicozinc tablets will give extra nutrition in the diet instead of Chyavanprash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य