सायकल रॅली नागपुरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:48+5:302021-09-16T04:12:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाची अखंडता व एकतेचा संदेश देशभरात पोहोचविण्याच्या उद्देशाने सीआरपीएफच्यावतीने कन्याकुमारी ते राजघाट अशी सायकल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाची अखंडता व एकतेचा संदेश देशभरात पोहोचविण्याच्या उद्देशाने सीआरपीएफच्यावतीने कन्याकुमारी ते राजघाट अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. कन्याकुमारीवरून २२ ऑगस्टला या सायकल रॅलीला सुरुवात झाली. ती बुधवारी सायंकाळी नागपुरात पोहोचली. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी रॅलीचे स्वागत केले.
यानिमित्त हिंगणा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या परिसरात आयोजित कार्यक्रमात आरपीएफचे उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर, कमांडंट सुभाष चंद्र, संतोष मिश्रा, कमांडंट करूणा राय, जनसंपर्क अधिकारी प्रदीप द्विवेदी उपस्थित होते. हैदराबादवरून साधारणत ५८० किलोमीटरचे अंतर कापून ही ३० सायकलपटूंची रॅली सायंकाळी नागपुरात दाखल झाली. त्यात सहभागी अपंग व महिला सायकलपटूंचे कौतुक करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये स्वराज्य गर्जना ढोलपथकांच्यावतीने ढोलताशांचे सादरीकरण करण्यात आले तर नेहरू युवा केंद्राच्यावतीने देशभक्तिपर गीतावर आधारित नृत्य सादर करण्यात आले. केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीही नृत्य सादर केले.