शुद्ध हवा, हिरवळ वाचविण्यासाठी सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:14+5:302021-01-25T04:09:14+5:30
नागपूर : एकीकडे दिल्लीमध्ये जमिनीसाठी शेतकऱ्यांकडून येत्या २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्यात येत आहे. त्याच धर्तीवर शहरातील शुद्ध ...
नागपूर : एकीकडे दिल्लीमध्ये जमिनीसाठी शेतकऱ्यांकडून येत्या २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्यात येत आहे. त्याच धर्तीवर शहरातील शुद्ध हवा आणि अजनीवनाची हिरवळ वाचविण्यासाठी नागपूरच्या पर्यावरणप्रेमींकडून विशाल सायकल मार्च काढला जाणार आहे.
अजनी वाचवा माेहिमेंतर्गत येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल रॅलीची जाेरदार तयारी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. साेशल मीडियावर या सायकल रॅलीचा जाेरदार प्रचार केला जात असून, प्रत्येकामध्ये याबद्दल उत्सुकता आहे. शहरातील ५०० च्यावर सायकलिस्टनी यामध्ये सहभागी हाेण्यासाठी आतापासूनच नाेंद केल्याची माहिती संयाेजक कुणाल माैर्य यांनी दिली. संविधान चाैकातून सकाळी ६.३० वाजता या रॅलीला सुरुवात हाेणार आहे. नंतर शहरात १० किलाेमीटरचा परिसर फिरून रेल्वे मेन्स शाळा, अजनीवर येथे रॅलीचा समाराेप हाेइल. कुणाल म्हणाले, या दशकभरात विकास कामाच्या नावाने नागपूरची हिरवळ अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे. ३३ टक्के ग्रीन कव्हर घटल्याची नाेंद सरकारी आकड्यात आहे. अशाप्रकारे हवा शुद्ध करण्याची नैसर्गिक यंत्रणाच आपण संपवीत आहाेत. इंटर माॅडेल स्टेशनच्या गाेंडस नावाने ३०,००० हून अधिक झाडे कापली जाणार आहेत. नागपूरच्या पर्यावरणाला हाेणारा हा धक्का कधीही भरून निघणारा नाही. अशावेळी शुद्ध हवेसाठी झाडांचे रक्षण करणे हे संविधानिक कर्तव्य आहे, हे समजून नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कुणाल यांनी केले.
- रेल्वे मेन्ससाठी माजी विद्यार्थी सरसावले
रेल्वे मेन्स शाळा वाचविण्यासाठीही प्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रमांचे आयाेजन माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आयाेजित केले आहे. सकाळी झेंडावंदन व शाळेत वृक्षाराेपणानंतर माजी विद्यार्थी स्पाेर्ट्स डे साजरा करण्यात येईल. क्रिकेट, व्हाॅलिबाॅल, कबड्डीसह विविध स्पर्धांचे आयाेजन करीत अजनीवन व शाळा वाचविण्यासाठी आंदाेलन केले जाणार असल्याचे संयाेजक अनिकेत कुत्तरमारे यांनी सांगितले.