दुचाकी स्लीप, तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:11 AM2021-08-15T04:11:29+5:302021-08-15T04:11:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली आणि दुचाकीवरील दाेघेही खाली काेसळले. त्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली आणि दुचाकीवरील दाेघेही खाली काेसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-येनवा-नरखेड मार्गावरील कलंभा (ता. काटाेल) शिवारात गुरुवारी (दि. १२) सायंकाळी घडली.
स्नेहल खाेब्रागडे (२९, रा. पिवळी नदी, कामठी राेड, नागपूर) असे मृत तरुणाचे तर अनिकेत नीलेश बन्साेड (२१, रा. साैभाग्यनगर, हुडकेश्वर राेड, नागपूर) असे जखमीचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, ते खासगी कंपनीमध्ये नाेकरी करायचे. ते एमएच-४९/एक्यू-१६४१ क्रमांकाच्या माेटरसायकलने नरखेडहून काटाेलमार्गे नागपूरला जात हाेते. ते कलंभा शिवारात पाेहाेचताच स्नेहलचा माेटरसायकलवरील ताबा सुटला व ती स्लीप झाल्याने दाेघेही खाली काेसळले.
यात स्नेहलच्या डाेक्याला गंभीर तर अनिकेतच्या उजव्या पायाला किरकाेळ दुखापत झाली. दाेघांनाही लगेच काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती स्नेहलला मृत घाेषित केले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक संताेष निंभाेरकर करीत आहेत.