सायकलने सहाच महिन्यांत ३५ किलाे वजन केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:32+5:302021-06-04T04:07:32+5:30

नागपूर : मी लहानपणापासून खेळाडू म्हणूनच राहिले हाेते; पण महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाच्या दबावामुळे खेळणे मागे पडत गेले आणि वजन ...

The bicycle weighed less than 35 kg in six months | सायकलने सहाच महिन्यांत ३५ किलाे वजन केले कमी

सायकलने सहाच महिन्यांत ३५ किलाे वजन केले कमी

Next

नागपूर : मी लहानपणापासून खेळाडू म्हणूनच राहिले हाेते; पण महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाच्या दबावामुळे खेळणे मागे पडत गेले आणि वजन वाढत गेले. वजन ९२ किलाेपर्यंत वाढले हाेते. या काळात वर्धा राेडवरील एका शैक्षणिक संस्थेत नाेकरी मिळाली. ऑफिस घरापासून २५ किमी अंतरावर हाेते. का काेणास ठाऊक पण त्यावेळी मी सायकलने जाण्याचा निर्धार केला. जाण्या-येण्यात ५० किमीचा प्रवास राेजचा. आश्चर्य म्हणजे पाच-सहा महिन्यांतच वजन ३५ किलाेने कमी झाले. नागपूरच्या सायकल मेयर दीपांती पाल यांनी जीवनात घडलेला बदलाचा प्रवास लाेकमतपुढे मांडला.

दीपांती पाल गेल्या तीन वर्षांपासून प्राेफेशनल सायकलिस्ट म्हणून वावरत आहेत. दीपांती यांनी नेहमी कार्यालयीन प्रवास सायकलने केला आहे. सायकलविषयी जनजागृती करण्यासाठी त्या करीत असलेल्या कार्याचा सन्मान म्हणून आंतरराष्ट्रीय संघटनेने त्यांना बायसिकल मेयर म्हणून गाैरविले आहे. ऑफिसमध्ये सायकलने प्रवास करताना त्यांचे मन सायकल रायडिंगकडे वळले आणि ऑफिसव्यतिरिक्त त्यांचा हा प्रवास सुरू झाला. कधी २०० किमी, ४०० किमी तर कधी ६०० किमीची वैयक्तिक रायडिंग त्यांनी केली. याच काळात २०१८ मध्ये एका आंतरराष्ट्रीय एकल इव्हेंटमध्ये सहभागी हाेत ठरावीक वेळात २००, ३००, ४०० व ६०० किमी सायकल चालविण्याचा विक्रम केला. एका कॅलेंडर वर्षात प्रत्येक दाेनदा रायडिंग करणाऱ्या त्या भारतातील एकमेव हाेत्या. त्यानंतर याच क्षेत्रात करिअर करायचे म्हणून नाेकरी साेडली व स्वत:ची फर्म सुरू केली. त्यांचे सायकलप्रेम आजही कायम आहे. फिटनेससाठी सायकलचे महत्त्व वाढले आहे; पण लाेकांनी फॅशन म्हणून स्वीकार करू नये तर सायकल ही जीवनाचा भाग व्हावी, अशी त्यांनी भावना आहे. नागरिकांनी ऑफिसमध्ये दरराेज किंवा आठवड्यातून एकदा तरी सायकलने प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दैनंदिन कामाचा ताण कमी झाला : संजय धाेटे ()

संजय धाेटे हे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून सेवारत आहेत. काेराेनाच्या प्रकाेपामुळे राेजचे वाॅकिंग बंद झाल्याने राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी म्हणून त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच सायकलिंग सुरू केले. १०-१५ सहकाऱ्यांसाेबत राेज सकाळी ३० किमी सायकलिंग करण्याची सवयच त्यांनी लावली. विशेष म्हणजे या काळात त्यांचा लठ्ठपणा दूर हाेऊन २१ किलाे वजन घटले. ग्रुपमधील काही शुगर पेशंट सदस्यांची औषधी बंद झाली. दैनंदिन कामाचा ताण कमी झाला असून, तरतरी वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: The bicycle weighed less than 35 kg in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.