शेतमालाची बोली सुरू झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:09 AM2021-03-27T04:09:29+5:302021-03-27T04:09:29+5:30
उमरेड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८,२० आणि २३ मार्च रोजी शेतमालाची बोली झाली नव्हती. सततचा पाऊस आणि यामुळे ...
उमरेड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८,२० आणि २३ मार्च रोजी शेतमालाची बोली झाली नव्हती. सततचा पाऊस आणि यामुळे व्यापाऱ्यांनी दाखविलेली पाठ, या कारणामुळे शेतकऱ्यांचा माल बाजार समितीमध्ये पडून होता. काहींचा शेतमाल ओला झाल्याने शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अखेरीस २५ मार्च रोजी शेतमालाची बोली झाली. चणा १०,२३० क्विंटल, सोयाबीन १,१२९ क्विंटल तर तूर ४६७ क्विंटल यासह अन्य शेतमालाची यथोचित बोली झाली. बोलीदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू यांनी स्वत: हजेरी लावत बारकाईने लक्ष दिले. चणा ४,००० ते ४,७४५ रुपये तर सोयाबीनला ४,५०० ते ५,७०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
वीणा राहाटे
उमरेड : वीणा जगदीश राहाटे (५८, परसोडी, उमरेड) यांचे निधन झाले. त्यांच्यावर भिवापूर मार्गावरील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार पार पडले. पालिकेचे माजी नगरसेवक जगदीश राहाटे यांच्या त्या पत्नी होत.