नागपुरातील सदर भागात वर्कशॉपला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:55 PM2018-02-28T23:55:29+5:302018-02-28T23:55:47+5:30

सदर येथील एअर कंडिशिनिंग रेफ्रीजरेशन प्रा.लि. रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग सेंटरला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत लाखोंचा माल खाक झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास कसरत करावी लागली.

Big Fire to workshop at Sadar area of ​​Nagpur | नागपुरातील सदर भागात वर्कशॉपला भीषण आग

नागपुरातील सदर भागात वर्कशॉपला भीषण आग

Next
ठळक मुद्देएसी, फ्रीज, वॉशिंग मशीनसह लाखोंचा माल खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर येथील एअर कंडिशिनिंग रेफ्रीजरेशन प्रा.लि. रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग सेंटरला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत लाखोंचा माल खाक झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास कसरत करावी लागली.
सदर भागात बहेराम पटेल आणि डोराब पटेल संचालित रेफ्रीजरेशन प्रा.लि. रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग सेंटर आहे. या ठिकाणी फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन आदींची सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीची कामे केली जातात. दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आग वर्कशॉपमध्ये पसरली. फ्रीज, एसीमध्ये कुलिंगसाठी गॅसचा वापर केला जातो. आगीमुळे गॅस भरलेल्या क्रॉम्प्रेसरचे चार ते पाच स्फोट झाले. यामुळे संपूर्ण वर्क शॉप आगीच्या विळख्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या १० गाड्या विविध स्थानकावरून घटनास्थळी पोहोचल्या. वर्कशॉपला टिनाचे शेड असल्याने पाण्याचा मारा करणे कठीण होत होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांना चार तास मेहनत करावी लागली.
आगीत एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, मायक्रोवेव्ह, संगणक, वॉटर कूलर, डिफिटशन, वॉटर डीफ्रिशन, रिटेल शेफ, जनरेटर, फ्रीज आणि एसीचे स्पेअर पार्ट यासह दीड लाखाची रोख जळून खाक झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्यासह राजू दुबे, अनिल गोडे, नाखोड, कावळे, सुनील राऊत यासह इतर अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी होते. विशेष म्हणजे या वर्कशॉपला दोन वर्षांपूर्वीही अशीच आग लागली होती. त्यानंतरही आग नियंत्रणाची उपकरणे नव्हती.
सुदैवाने मोठा अनर्थ टळला
विद्युत प्रवाह खंडित झाल्यास वीज पुरवठा करण्यासाठी वर्कशॉपमध्ये दोन डिझेल जनरेटर होते. या जनरेटरमध्ये तब्बल ४०० लिटर डिझेल होते. जनरेटरला आग लागली असती तर स्फोट होऊन परिसरातील दुकानांना मोठा धोका होता. यात प्राणहानी होण्याची शक्यता होती. परंतु अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
चर्चचे सदस्य मदतीला धावले
वर्कशॉपला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आर्च बिशप हाऊ सचे फादर आणि चर्चचे सर्व सदस्य मदतीसाठी धावून आले. आग आटोक्यात आणताना अग्निशमन विभागाच्या गाड्यांना घटनास्थळी जाण्यासाठी रस्ता नसल्याने चर्च उघडण्यात आले.तसेच चर्चचे टेरेस उपलब्ध करण्यात आले. यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्याला मदत झाली.

 

Web Title: Big Fire to workshop at Sadar area of ​​Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.