राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 08:48 PM2023-05-04T20:48:27+5:302023-05-04T20:51:03+5:30

आम्ही संन्यासी नाही राजकीय पक्ष आहोत, असं बावनकुळे यांनी नमूद केलं.

Big NCP leader in contact with BJP leader Chandrasekhar Banwankule said it clearly targeted uddhav thackeray | राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं 

राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं 

googlenewsNext

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडीविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं. “तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. शरद पवार कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील, शेवटी त्यांना जो घ्यायचा ते तो घेतील. राष्ट्रवादीचा कुठलाही नेता आमच्या संपर्कात नाही. कोणीही संपर्क केलं नाही. कोणी आलं तर आमचा झेंडा आणि दुपट्टा तयार आहे. आम्ही कोणाला ये म्हणणार नाही. मात्र आम्ही संन्यासी नाही राजकीय पक्ष आहोत,” असं त्यांनी नमूद केलं.  

ते नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोपांविषयी त्यांनी भाष्य केलं. “ज्यावेळी उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा मोदींवर स्तुतीसुमने उधळीत होते, त्याचे आमच्याकडे रेकॉर्ड आहे. आता तुम्ही विरोधी लोकांसोबत गेल्यानं आता तुम्हाला विरोध करणं भाग आहे. बारसूची जनता ठाकरे यांना तिथे येऊ देणार नाही,” असं बावनकुळे म्हणाले.  

स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही

“उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत. मविआच्या वज्रमूठाला तडे गेले आहे. त्यांच्या सभांना लोक येत नाही, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल.” असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसला ४४० व्होल्टचा झटका लागणार

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक निवडणुकीत जय बजरंग बली चा नारा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्हाला समज आली तेव्हापासून आम्ही हनुमान मंदिरात जातो. काँग्रेसनं बजरंग दलाबाबत घेतलेला निर्णय याचा जनता मतांमधून उत्तर देईल. कर्नाटकमध्ये भाजपाला विजय मिळणारच आहे, तर २०२४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला ईव्हीएममधून ४४० व्होल्टचा झटका लागणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Big NCP leader in contact with BJP leader Chandrasekhar Banwankule said it clearly targeted uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.