शस्त्रांची तस्करी करणाºया बिहारी तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:50 AM2017-08-11T02:50:30+5:302017-08-11T02:50:53+5:30

शस्त्रांची तस्करी करणाºया बिहारच्या एका तरुणासह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, चार मॅग्जीन आणि २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली.

Bihari youth arrested for arms smuggling | शस्त्रांची तस्करी करणाºया बिहारी तरुणाला अटक

शस्त्रांची तस्करी करणाºया बिहारी तरुणाला अटक

Next
ठळक मुद्देस्थानिक दोन आरोपीही गजाआड : दोन पिस्तूलांसह २४ काडतूस जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शस्त्रांची तस्करी करणाºया बिहारच्या एका तरुणासह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, चार मॅग्जीन आणि २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून तो गुरुवार सकाळपर्यंत ही कामगिरी बजावली, अशी माहिती परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली. अब्दुल मन्नान (वय १९, रा. बिसनपूर असरगंज, जि. मुंगेर, बिहार) असे मुख्य शस्त्र तस्कराचे नाव असून तो बीएस्सीचा विद्यार्थी आहे. दीपक दारुवाला ऊर्फ दीपक प्रेमलाल मनसुरे आणि हेमराज गोपीचंद शेंडे (रा. जगदीशनगर) अशी स्थानिक आरोपींची नावे आहेत.
बिहारचा एक तरुण शस्त्र तस्करी करतो, तो गिट्टीखदानमधील ग्वालबन्सीच्या निर्मलगंगा अपार्टमेंटजवळ शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना बुधवारी रात्री मिळाली. त्यावरून निर्मलगंगा अपार्टमेंटच्या आजूबाजूला सापळा लावला. रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास नमूद वर्णनाचा तरुण नजरेस पडताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅग्जीन आणि १४ जिवंत काडतूस सापडले. पोलिसांच्या चौकशीत त्याने आपले नाव मन्नान सांगितले. नागपुरात नियमित शस्त्र विक्रीसाठी येत असल्याचे सांगून चार दिवसांपूर्वी दीपक दारुवाला नामक तरुणाला आपण अशाच प्रकारे एक पिस्तूल विकल्याचीही माहिती त्याने दिली. दीपकचा मोबाईल नंबर मन्नानजवळ होता. त्यावरून पत्ता काढून पोलिसांनी दीपक दारुवाला ऊर्फ मनसुरेला अटक केली. त्याने मन्नानजवळून आपण नव्हे तर हेमराज शेंडे याने पिस्तूल घेतल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी हेमराजला अटक केली. त्याच्याजवळूनही पोलिसांनी एक पिस्तूल, दोन मॅग्जीन आणि १० जिवंत काडतूसं जप्त केली.

१५ हजारात पिस्तूल, २८० रुपयात काडतूस
बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात देशी बनावटीची पिस्तुले, मॅग्जीन आणि काडतुसे तयार केली जातात. या पिस्तुलांची बनावट विदेशी बनावटीच्या पिस्तुलांसारखी आहे. तेथून आपण नियमित पिस्तुलांची खेप नागपुरात आणत होतो, असे मन्नानने पोलिसांना सांगितले. १५ हजार रुपयात पिस्तूल विकत घेऊन ते नागपुरात २० हजारात विकतो, असेही तो म्हणाला. एका काडतुसाची किंमत तेथे २८० रुपये आहे. ते आपण नागपुरात ३५० रुपयात विकत होतो, असेही त्याने सांगितल्याची माहिती पोलीस उपायुक्त ओला यांनी दिली. त्याने आतापावेतो नागपुरात किती पिस्तूल, मॅग्जीन आणि काडतूस विकले, कुणाला विकले, त्याची चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले.
आरोपींचा पीसीआर, चिनीची शोधाशोध सुरू
बिहारमधील मन्नानला नागपुरात शस्त्र तस्करी आणि विक्रीत मदत करणाºया एका आरोपीचे नाव चिनी असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस सांगतात. दरम्यान, अटकेतील आरोपींची न्यायालयातून तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त देवळे, गिट्टीखदानचे ठाणेदार राजकमल वाघमारे, उपनिरीक्षक साजीद अहमद, हवालदार युवराज ढोले, नायक संतोष उपाध्याय, शेख आफताब, शेख इमरान, आशिष आदींनी बजावली.
 

Web Title: Bihari youth arrested for arms smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.