दारूसाठी १०० रुपये न दिल्याने दुचाकी जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:06 AM2021-09-11T04:06:32+5:302021-09-11T04:06:32+5:30

नागपूर : कुख्यात गुन्हेगार सिकंदर ऊर्फ शेखू खानने दारूसाठी १०० रुपये न दिल्यामुळे दुचाकीला आग लावली. ही घटना गुरुवारी ...

The bike was set on fire for not paying Rs 100 for liquor | दारूसाठी १०० रुपये न दिल्याने दुचाकी जाळली

दारूसाठी १०० रुपये न दिल्याने दुचाकी जाळली

Next

नागपूर : कुख्यात गुन्हेगार सिकंदर ऊर्फ शेखू खानने दारूसाठी १०० रुपये न दिल्यामुळे दुचाकीला आग लावली. ही घटना गुरुवारी रात्री जरीपटकाच्या मेकोसाबागमध्ये घडली. बेझनबाग येथील रहिवासी सुनील कावळे रात्री ११.४५ वाजता दुचाकीवर जात होते. मेकोसाबाग जवळ शेखूने त्यांना अडवले. त्याने दारू पिण्यासाठी १०० रुपये मागितले. सुनीलने पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे त्याने शिवीगाळ करून मारहाण करणे सुरू केले. घाबरून सुनीलने दुचाकी सोडून तेथून पळ काढला. शेखूने त्याच्या दुचाकीला आग लावली. सुनीलच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेखूला अटक केली आहे. शेखू कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपासून पोलिसांवर मारहाण आणि वसुलीचा आरोप लावल्यामुळे चर्चेत आला होता. शेखूशी निगडित नागरिकांनी त्याच्या बोलण्याची क्लिप व्हायरल केली होती. पोलिसांवर दबाव येत असल्यामुळे शेखू नव्या पद्धतीने गुन्हे करीत होता. या प्रकरणाला पोलिसांनी गंभीरपणे घेतले आहे. ते शेखूसोबत त्याच्या साथीदारांना धडा शिकविण्याच्या तयारीला लागले आहेत.

................

Web Title: The bike was set on fire for not paying Rs 100 for liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.