नागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 15:37 IST2018-07-09T15:34:13+5:302018-07-09T15:37:40+5:30
भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे रामदयाल तेजराम अंबुले (वय ४५) या दुचाकीस्वाराचा करुण अंत झाला. अंबुले कामठीजवळच्या येरखेडा येथील खुशबू लॉनजवळ राहत होते.

नागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करुण अंत
ठळक मुद्देकामठी मार्गावरील आॅटोमोटीव्ह चौकात झाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे रामदयाल तेजराम अंबुले (वय ४५) या दुचाकीस्वाराचा करुण अंत झाला. अंबुले कामठीजवळच्या येरखेडा येथील खुशबू लॉनजवळ राहत होते.
रविवारी दुपारी १२. ४० वाजता ते कामठी मार्गाने मोटरसायकलने (एमएच ४०/ एवाय १४८०) जात होते. आॅटोमोटीव्ह चौकात एमएच ४०/ एन ९९०० क्रमांकाच्या ट्रक चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून रामदयाल अंबुले यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. डॉक्टरकडे नेले असता त्यांना मृत घोषित केले. उमा रामदयाल अंबुले (वय ४२) यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.