बिलासपूर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:20 AM2017-09-19T00:20:00+5:302017-09-19T00:20:14+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दानापूर आणि बिलासपूर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमधून दारूच्या ६,५९० रुपये किमतीच्या ३५ बाटल्या पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दानापूर आणि बिलासपूर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमधून दारूच्या ६,५९० रुपये किमतीच्या ३५ बाटल्या पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांनी गठित केलेल्या चमूतील उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, विवेक कनोजिया, उमेश सिंह यांनी सोमवारी दुपारी १२.३५ वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी मागील जनरल कोचमध्ये त्यांना एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. या बॅगवर कोणत्याही प्रवाशाने हक्क न सांगितल्यामुळे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ४,२५० रुपये किमतीच्या ३० बाटल्या होत्या. दुसºया घटनेत दुपारी ३.३० वाजता चमूने रेल्वेगाडी क्रमांक २२८१५ बिलासपूर-एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी केली असता त्यांना एका बेवारस बॅगमध्ये दारूच्या २,३४० रुपये किमतीच्या पाच बाटल्या आढळल्या. जप्त करण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे.