रेकॉर्ड मोडत सुसाट धावतेय 'बिलासपूर-नागपूर' वंदे भारत; प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
By नरेश डोंगरे | Published: August 20, 2023 07:31 PM2023-08-20T19:31:37+5:302023-08-20T19:31:48+5:30
नव्या भारताची नवी ट्रेन सुसाट
नागपूर : नव्या भारताची नवी ट्रेन अशी ख्याती मिळवणाऱ्या आलिशान वंदे भारत ट्रेनने संपूर्ण मध्य भारताच्या क्षेत्रात बिलासपूर-नागपूर मार्गावर सर्वाधिक आणि रेकॉर्डतोड व्यवसाय केला आहे.
मध्य भारतात सध्या वेगवेगळ्या मार्गावर ८ वंदे भारत ट्रेन चालविण्यात येतात. हाय स्पीड आणि सर्व सुविधा असलेल्या या ट्रेनची तिकिीटही जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी या ट्रेनने प्रवास करण्याचे टाळतात. मात्र, ज्यांना कमी वेळेत आणि चांगल्या सुविधा मिळवत प्रवास करायचा, असे प्रवासी मोठ्या संख्येत वंदे भारतला प्राधान्य देतात. मध्य भारतात धावणाऱ्या वंदे भारत मध्ये ऑगस्ट २०२३ मध्ये सर्वच गाड्यात आसन क्षमतेच्या तुलनेत प्रवास करणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांच्या वर आहे. त्यातल्या त्यात ट्रेन नंबर २०८२५ बिलासपूर - नागपूर वंदे भारत ट्रेनमध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १०४ टक्के प्रवाशांनी प्रवास केला आहे.
अशी आहे प्रवाशांची टक्केवारी
२०८२५ बिलासपूर-नागपूर - १०४ टक्के
२०८२६ नागपूर-बिलासपूर - ८६ टक्के
२२२२३ सीएसएमटी-शिर्डी - ८० टक्के
२२२२४ शिर्डी-सीएसएमटी - ७८ टक्के
२२२२५ सीएसएमटी-सोलापूर - ९५ टक्के
२२२२६ सोलापूर-सीएसएमटी ९४ टक्के
२२२२९ सीएसएमटी-गोवा-सीएसएमटी ९५ टक्के