चोरी लपविण्यासाठी ‘बिलां’चीही होतेय खरेदी; ट्रकांमध्ये भरला जातोय जास्त कोळसा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 05:42 AM2024-07-23T05:42:04+5:302024-07-23T05:42:15+5:30

‘रिजेक्ट’ मालही करीत आहे मालामाल

'Bills' are also being purchased to hide the theft; Trucks are loaded with more coal | चोरी लपविण्यासाठी ‘बिलां’चीही होतेय खरेदी; ट्रकांमध्ये भरला जातोय जास्त कोळसा

चोरी लपविण्यासाठी ‘बिलां’चीही होतेय खरेदी; ट्रकांमध्ये भरला जातोय जास्त कोळसा

कमल शर्मा
 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोल वॉशरीच्या भ्रष्टाचारांचे रोज नवनवीन प्रकरण उघडकीस येत आहे. आता कोल वॉशरींकडूनही कोळसा चोरीला जात असून, तो लपविण्यासाठी नियमित बिलांची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. कोळसा व्यवसायाशी निगडित शहरातील अनेक पांढरपेशे लोकही  मलिदा खाण्यासाठी न घाबरता त्याला साथ देत आहेत.

वीज केंद्राला धुतलेल्या कोळशाचा पुरवठा करण्याची जबाबदारी कोल वॉशरीजवर सोपवण्यात आली आहे. वीज केंद्रातून होणारे प्रदूषण नियंत्रित करणे, हा त्याचा उद्देश आहे. ‘महाजेनको’ने महाराष्ट्र स्टेट मायनिंग काॅपोर्रेशन (एमएसएमसी)ला नोडल एजन्सी बनवले आहे आणि हिंद महामिनरल (बिलासपूर) आणि एसीबी इंडिया (नोएडा) यांना ८० टक्के काम दिले आहे. तर महावीर आणि रुक्माई यांना २० टक्क्यांखाली काम मिळाले आहे. आता महावीर आणि रुक्माई यांनी खास करून अधिकाधिक संपत्ती मिळवण्यासाठी एक विचित्र खेळ सुरू केला आहे. याबाबतीत ते हिंद आणि एसीबीच्या मार्गावरच आहेत.
विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे की, स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने कोल वॉशरीज त्यांच्या ट्रकमध्ये १२ टन ऐवजी १६ टन कोळसा भरतात. शिवाय, धुताना चांगल्या प्रतीचा कोळसाही बाहेर काढला जातो. ‘महाजेनको’च्या अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे रिजेक्ट कोलच्या नावाखाली उत्तम दर्जाचा कोळसा मिळवून कोल वॉशरीज श्रीमंत होत आहेत.

आता कोल वॉशरीज हा कोळसा खासगी वीज केंद्र आणि इतर व्यावसायिकांना विकतात. मात्र, यासाठी त्यांना बिल हवे असते. नागपुरातील कोळसा व्यापारी त्यांना या कामात मदत करत आहेत. या रॅकेटमध्ये वर्धमाननगर आणि हनुमाननगर येथील रहिवासी व्यापाऱ्यांनी कोल वॉशरी सोबत हातमिळवणी केली आहे. 

वीटभट्ट्या आणि दोन ते चार टन कोळसा खरेदी करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना हे व्यापारी बिलाविना कोळसा देतात. जीएसटी वाचवण्यासाठी हे व्यावसायिक सहज तयार सुद्धा होता. आता या कोळशाचे बिल कोल वॉशरीला दिले जात आहे. आता त्यांना यासाठी कोळसा न भरता योग्य रक्कम मिळत आहे. दुसरीकडे कोल वॉशरी चालकही नियमानुसार जीएसटी भरून ते चोरीला गेलेला कोळसा कायदेशीर करत आहेत.

या घोटाळ्यास बडे कोळसा वाहतूकदार जबाबदार आहेत. सूत्रांनी ‘लोकमत’ला पत्र दाखवून ट्रक जीपीएसविना चालवले जात असल्याचे सांगितले. त्यांचे स्थान लपवले जात आहे. हे वाहतूकदार कोळसा वॉशरीज आणि व्यापारी यांच्यात पुलाचे काम करत आहेत. त्या बदल्यात त्यांना भरपूर मलई मिळत आहे.

Web Title: 'Bills' are also being purchased to hide the theft; Trucks are loaded with more coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.