नारा डेपोजवळ ५४ एकरात बायोडायव्हर्सिटी पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:13 AM2021-08-17T04:13:55+5:302021-08-17T04:13:55+5:30

नारा डेपो परिसरातील २१.७५ हेक्टर परिसरात या प्रकल्पाची निर्मिती केली जाणार आहे. या भागात सुमारे २०० चितळांचे वास्तव्य आहे. ...

Biodiversity Park on 54 acres near Nara Depot | नारा डेपोजवळ ५४ एकरात बायोडायव्हर्सिटी पार्क

नारा डेपोजवळ ५४ एकरात बायोडायव्हर्सिटी पार्क

Next

नारा डेपो परिसरातील २१.७५ हेक्टर परिसरात या प्रकल्पाची निर्मिती केली जाणार आहे. या भागात सुमारे २०० चितळांचे वास्तव्य आहे. येथील चितळ मानवी वस्तीत शिरण्याच्या तसेच त्यांच्यावर मोकाट कुत्र्यांचे हल्ले होण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. या संपूर्ण परिसराला आता भिंतीने बंदिस्त जाणार आहे. येथे प्रामुख्याने बाभूळ, पळस यांसारखी झाडे आढळतात. त्यांच्या जोडीने नवे वृक्षारोपण करून या परिसराला हिरवाई प्राप्त करून देण्याचे नियोजन आहे. विविध सुविधा आणि जैवविविधतेने युक्त असा हा परिसर विकसित केला जाईल. जंगली फुले, स्थानिक प्रजाती, वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींच्या झाडांचे रोपण. लाकूड संग्रहालय, निसर्ग माहिती केंद्र, योग आणि ध्यान परिसर, विविध वृक्ष प्रकारांचे वेगळे विभाग, औषधी वनस्पती क्षेत्र, गवताळ भाग, पाणवठे, निसर्गभ्रमण, बांबूवन भ्रमण, लहान मुलांच्या खेळण्याची सुविधा ही येथील वैशिष्ट्ये राहतील.

Web Title: Biodiversity Park on 54 acres near Nara Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.