राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनचरित्र आता हिंदीत; ‘युगदृष्टा’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 08:30 AM2021-04-30T08:30:00+5:302021-04-30T08:30:03+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य राष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषिकांना, तसेच अभ्यासकांना कळावे म्हणून ‘युगदृष्टा’ हर चरित्रग्रंथ अखिल भारतीय व्यापारी संघाच्या राष्ट्रीय बैठकीत प्रकाशित करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य राष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषिकांना, तसेच अभ्यासकांना कळावे म्हणून ‘युगदृष्टा’ हर चरित्रग्रंथ अखिल भारतीय व्यापारी संघाच्या राष्ट्रीय बैठकीत प्रकाशित करण्यात आला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी. सी. भरतिया, महासचिव प्रवीण खंडेलवार आणि इतर पाहुण्यांच्या हस्ते नागपुरात हा कार्यक्रम साधेपणाने पार पडला.
प्रारंभी पुस्तक प्रकाशनाचे प्रमुख व्यापारी नेता बी. सी. भरतीयांनी राष्ट्रसंतांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. ‘युगद्रष्टा’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार राष्ट्रीय स्तरावर पोहचण्यास मदत होईल. व्यापार सांभाळत ज्ञानेश्वर रक्षक यांनी केलेल्या या कार्याची त्यांनी प्रसंशा केली. ‘युगदृष्टा’चे लेखक ज्ञानेश्वर रक्षक यांनी पुस्तक परिचय करून दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवन कार्य इतर संतपरंपरेपेक्षा कसे वेगळे आहे, याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॅटचे सचिव फारूखभाई अकबानी यांचे सहकार्य लाभले.