बायोमेडिकल वेस्ट प्रकरण : ॲडव्हान्स पॅथ लॅब, शांतिप्रभा नर्सिंग होमवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 12:45 AM2021-03-20T00:45:50+5:302021-03-20T00:46:57+5:30
Biomedical waste case, Nagpur news सर्वसामान्य कचऱ्यात बायोमेडिकल वेस्ट फेकण्याच्या प्रकरणात शुक्रवारी रामदासपेठ येथील ॲडव्हान्स पॅथ लॅब २० हजार रुपये आणि शांतिप्रभा नर्सिंग होमवर १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसामान्य कचऱ्यात बायोमेडिकल वेस्ट फेकण्याच्या प्रकरणात शुक्रवारी रामदासपेठ येथील ॲडव्हान्स पॅथ लॅब २० हजार रुपये आणि शांतिप्रभा नर्सिंग होमवर १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मनपाच्या लक्ष्मीनगर झोनतर्फे एनडीएस पथकाने ही दंडात्मक कारवाई केली. नियमानुसार बायोमेडिकल वेस्टला सर्वसामान्य कचऱ्यासह किंवा उघड्यावर फेकता येत नाही.
उपरोक्त दोन्ही कारवाईसह एनडीएसने शुक्रवारी एकूण ६१ प्रतिष्ठानांची तपासणी केली. यात उपरोक्त लॅब व नर्सींग होमसह एकूण २५ प्रतिष्ठान, कार्यालयांवर १.८० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. लक्ष्मीनगर झोनमध्ये ३, धरमपेठ झोनमध्ये ५, धंतोलीमध्ये ३, नेहरूनगरमध्ये १, गांधीबागमध्ये ३, सतरंजीपुरा झोनमध्ये ४, लकडगंज झोनमध्ये १, आसीनगर झोनमध्ये २, मंगलवारी झोनमध्ये ३ कार्यालय व प्रतिष्ठांनांवर कोविड नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात झोन स्तरावर ही कारवाई केली जात आहे.