गोरेवाडा बायोपार्कमध्ये पक्षी गणना; विदेशी पक्ष्यांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 21:20 IST2022-02-07T21:19:50+5:302022-02-07T21:20:31+5:30
Nagpur News गोरेवाडा बायोपार्कमधील पाणवठ्यावर पक्षीगणना करण्यात आली.

गोरेवाडा बायोपार्कमध्ये पक्षी गणना; विदेशी पक्ष्यांची नोंद
नागपूर : गोरेवाडा बायोपार्कमधील पाणवठ्यावर पक्षीगणना करण्यात आली. यंदाच्या वार्षिक गणना कार्यक्रमाअंतर्गत गोरेवाडा तलावावर रेड क्रिस्टर्ड पोचार्ड, ग्रेट ग्रेटेस्टड ग्रेब, युरेशियन कुट, ब्राह्मनी डक आदी स्थानिक व स्थलांतरित विदेशी पक्ष्यांची नोंद घेण्यात आली.
या नोंदीनंतर प्रजातीनुसार, पक्ष्यांची संख्या नोंदविण्यात आली. या दरम्यान राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते, वाइल्ड लाइफ वॉर्डन अविनाश लोंढे, बर्ड्स वॉचर व्यंकटेश मुदलियार यांनी वन कर्मचारी आणि पक्षी निरीक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन गोरेवाडाच्या सहायक व्यवस्थापक कल्पना चिंचखेडे यांनी केले.